A tragic case from Hyderabad highlights the extreme consequences of relationship violence and mental trauma. saam tv
देश विदेश

गर्लफ्रेंडनं नकार दिला, बॉयफ्रेंडच्या डोक्यात हैवान शिरला; HIV चे इंजेक्शन टोचले, मनानं खचलेल्या मुलीनं आयुष्यच संपवलं

Hyderabad HIV Injection Case Details: हैदराबादमध्ये लग्नास नकार दिल्याने संतप्त प्रियकराने तरुणीला HIV संक्रमित इंजेक्शन टोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

हैदराबादमधील मेदचल जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. लग्नास नकार दिल्याने एका तरुणाने जबरदस्तीने HIV संक्रमित इंजेक्शन टोचल्यामुळे, एका २४ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मृत तरुणीचे नाव रमणी असून ती अन्नोजिगुडा येथील राजीव गृहकल्पा कॉलनीमध्ये वास्तव्यास होती. शनिवारी ती आपल्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने घाटकेसर येथील शासकीय रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पोलीस तपासात समोर आले आहे की, या आत्महत्येचे मूळ ११ मार्च रोजी घडलेल्या एका भयानक घटनेत आहे. मनोहर नावाच्या एका तरुणाने रमणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. रमणीने लग्नास नकार दिल्यानंतर संतापलेल्या मनोहरने तिला जबरदस्तीने HIV संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचले होते. या प्रकरणाची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मनोहरला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

HIV संसर्गाची भीती, समाजात होणारी बदनामी आणि झालेल्या शारीरिक-मानसिक आघातामुळे ती खचली होती. याच मानसिक दबावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. पोलीस सध्या या प्रकरणाच्या सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ना कोणता ब्रश, ना कोणती टूथपेस्ट; फक्त हा एक उपाय करून पाहा, दात मोत्यासारखे चमकतील

Maharashtra News Live Update : जळगाव- सिन्नरकडून येणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची जोरदार धडक; 12 जखमी

Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्या ७ राशींसाठी भाग्याची, बक्कळ पैसा मिळणार; तुमची रास यात आहे का?

Smartphone Explode : पावसाळ्यात स्मार्टफोनचा कधीही होऊ शकतो स्फोट, चुकूनही करू नका 'ही' १ चूक

IBD symptoms: अचानक ही 5 लक्षणं दिसली तर समजा आतड्यांना सूज आलीये!

SCROLL FOR NEXT