hyderabad shock Saam tv
देश विदेश

Hyderabad Shock : महिलेने चक्क रेल्वे ट्रॅकवरुन बुंगाट कार पळवली; कर्मचाऱ्यांच्या काळजाचं पाणीपाणी, पाहा थरारक व्हिडिओ

hyderabad car on railway track : रेल्वे ट्रॅकवरुन बुंगाट कार पळवल्याची घटना घडली आहे. हैदराबादमध्ये ही घटना घडली आहे.

Vishal Gangurde

रेल्वे ट्रॅकवर बुंगाट निघालेली कार हा कुठल्या थ्रिलर चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन नाही.....तर ही सत्य घटना आहे... एका महिलेने रेल्वे ट्रॅकवर बेधडक आणि बिनधास्त कार पळवलीय.... ते पाहून कर्मचाऱ्यांच्या काळजाचं पाणीपाणी झालं..महिलेचा कारनामा पाहून लोकंही आरडाओरड करत होते.

हा व्हिडीओ पुन्हा पाहा. महिला रेल्वे ट्रॅकवर बुंगाट कार पळवत आहे. महिलेचा कारनामा पाहून रेल्वेचे फोन खणाणले. आणि कर्मचाऱ्यांनी महिलेला रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केला. मात्र महिला काही ऐकायला तयार नव्हती. तिने तब्बल 8 किलोमीटर कार तशीच ट्रॅकवरुन पळवली. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी महिलेला गाठलं आणि कारमधून बाहेर काढलं. मात्र मद्यधुंद महिला काही ऐकायला तयार नव्हती.

तेलंगणातील शंकरपल्ली जवळच्या लिंगमपल्ली ते विकाराबाद जंक्शन दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवरच्या ड्राम्यामुळे हैदराबाद बंगळूर ट्रेन तब्बल पाऊण तास थांबवावी लागली. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. तर महिलेने हा ड्रामा का केला? तिची मानसिक स्थिती ठीक आहे का? की यामागे काही घातपाताचा कट होता? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. मात्र अशी वेडपट कृती महिलेच्याच नव्हे तर रेल्वेतील शेकडो प्रवाशांच्या जीवावर बेतली असती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : सुरुवात दोघांनी केली, बघता बघता अख्खं शहर एक झालं; आंदोलनाची धग वाढली, कडकडीत बंदपर्यंत पोहचली

Khaida Waterfall : हिरवीगार झाडी अन् फेसाळलेला धबधबा, मालवणमधील 'खैदा धबधबा' पर्यटकांना भुरळ घालतोय

Maharashtra Live News Update: सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत परभणी पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा

Night Sweat: कोणत्या आजारांमुळे रात्री घाम येतो?

Nitesh Rane: शाळा काय बंद करता मदरसे बंद करून दाखवा, मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान|VIDEO

SCROLL FOR NEXT