crime news Saam tv
देश विदेश

Shocking: संशयामुळे संसाराच शेवट! गावात विवाहबाह्य संबंधाची चर्चा, संतापलेल्या नवऱ्याने गोळ्या घालून मारलं, त्यानंतर...

Uttar Pradesh Crime: दिल्लीत काम करणाऱ्या व्यक्तीला पत्नीवर संशय आला की ती दुसऱ्या पुरुषाशी संबंधीत आहे. रागात त्याने पत्नीवर गोळी झाडली आणि नंतर स्वतःचे प्राण घेतले.

Dhanshri Shintre

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील गाजीपूर पोलीस स्टेशनअंतर्गत लमेहता गावात खून आणि आत्महत्येची एक धक्कादायक घटना घडली. शनिवारी रात्रीच्या या घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे गावात एकासोबत अवैध संबंध असल्याचा संशय व्यक्त करत तिला गोळी मारुन ठार मारले आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मृत दाम्पत्याची ओळख मुकेश निषाद (३२) आणि त्यांची पत्नी गुडिया देवी (२६) वर्षाची झाली आहे. दोघांचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना तीन लहान मुली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश दिल्लीत मजूर म्हणून काम करत होता आणि आठवडाभरापूर्वीच गावी परतला होता. घरी आल्यावर त्याला पत्नीचे शेजाऱ्याशी कथित अवैध संबंध असल्याचे समजले. ते गावभर चर्चेचा विषय बनले होते. या संशय आणि संतापामुळे त्यांच्या नात्यात तणाव वाढला. शनिवारी रात्री पती-पत्नीमध्ये यावरून वाद झाला आणि रागाच्या भरात मुकेशने देशी बनावटीच्या पिस्तूलातून गोळी मारुन गुडियाचा जीव घेतला. पत्नी जागीच मरण पावली आणि त्यानंतर त्याने स्वतःलाही गोळी मारुन आत्महत्या केली.

गोळीबाराचा आवाज ऐकून त्याच्या तीन मुली तसेच दुसऱ्या खोलीत झोपलेले सगळे घाबरले. ते आत गेले आणि पाहिले त्यांना दोघेही रक्तबंबाळ पडलेले आढळले. घटनास्थळावर लगेचच गावकरी जमा झाले आणि पोलिसांना माहिती दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक महेंद्र पाल सिंह यांच्या मते, घटनास्थळावरून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून, फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

स्थानिक रहिवाशांच्या मते, गुडिया देवी आणि तिच्या शेजाऱ्यातील कथित प्रेमसंबंधाबद्दल गावात नेहमी चर्चा होत असायची. मुकेशलाही हे माहिती होते, ज्यामुळे तो मानसिक दबावाखाली होता. अखेर या कटू परिस्थितीच्या शेवटी त्याने सर्व संपवण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे गावात हळहळ आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे. पालकांच्या मृत्यूनंतर तिन्ही मुलींचा आक्रोश संपूर्ण गावाला हलावून टाकत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT