Husband Wife Dispute Saam Tv
देश विदेश

Husband Wife Dispute : नवऱ्यानं १० ऐवजी ३० रुपयांची लिपस्टिक आणली, बायको रुसून माहेरी गेली; प्रकरण पार घटस्फोटापर्यंत गेलं अन्...

Rohini Gudaghe

Latest Agra News Husband Wife Clash

नवरा बायकोत छोटीमोठी भांडणं होत असतात. कधी या भांडणांच कारण क्षुल्लक असतं, तर कधी गंभीर असतं. उत्तर प्रदेशातील आग्रा येथून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याला ३० रुपयांची लिपस्टिक विकत घेणं महागात पडलं (Husband Wife Clash) आहे. लिपस्टिकवरून वाद इतका वाढला की, पती-पत्नीमधील भांडण थेट घटस्फोटापर्यंत गेलं आहे.  (latest marathi news)

बायकोने नवऱ्याला १० रूपयांची लिपस्टिक आणायला सांगितली होती. परंतु नवऱ्यांने ३० रूपयांची लिपस्टिक आणली. बायको रुसून माहेरी गेल्याची घटना घडली (Agra News) आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवरा बायकोत भांडण

नवऱ्यानं महागडी लिपस्टिक आणल्याचा बायकोला राग आला. तिने नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्राकडे वर्ग केलं आहे. समुपदेशन केंद्रात दोघांनाही समजवण्याचं काम सुरू (Dispute Over Lipstick) आहे.

एतमादपूर पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणीचा मथुरा जिल्ह्यातील महावन येथील तरुणाशी लग्न झालं होतं. दोघांनी २०२२ मध्ये लग्न केलं होतं. हा तरुण एका खासगी कंपनीत काम (Husband Wife Clash) करतो. बायकोने नवऱ्याला लिपस्टिक आणायला सांगितलं होतं. नवरा लिपस्टिक घेऊन घरी आला. त्यानंतर बायकोने लिपस्टिक जमिनीवर फेकून भांडण सुरू केलं.

महागड्या लिपस्टिकवरून भांडण

बायकोनं विचारलं की, त्याने (पतीने) इतकी महागडी लिपस्टिक का आणली? कौटुंबिक समुपदेशन केंद्रात बायकोनं आरोप केला की, नवरा जास्त पैसे खर्च करतो. भविष्यासाठी काहीही वाचवत नाही. तो ३० रुपयांपेक्षा स्वस्त लिपस्टिक आणू शकला असता. पण त्यानं तिचं ऐकलं नाही.

यावर स्पष्टीकरण देताना नवरा म्हणाला की, ३० रुपयांपेक्षा स्वस्तात कोणतीही लिपस्टिक उपलब्ध नव्हती. म्हणूनच त्याने ही लिपस्टिक आणली आहे. यावरून दोघांमध्ये भांडण (Husband Wife Dispute) झालं होतं. पत्नी गेल्या एक महिन्यापासून तिच्या माहेरच्या घरी राहत होती. हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रात आल्यानंतर समुपदेशक सतीश खीरवार यांनी सांगितले की, महागडी लिपस्टिक आणण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. बायकोला मुलांसाठी पैसे वाचवायचे आहेत. सध्या दोघांमध्ये सामंजस्य करार झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांचा राडा, दोन गटांत तुंबळ हाणामारी, पाहा

PM Kisan Samman Nidhi : नवरात्रीनिमित्त PM मोदींकडून शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट; किसान सम्मान निधीचा १८ वा हप्ता खात्यात जमा

Bombay Vada pav : मुंबईच्या वडापावचं टोपण नाव माहितीये का?

PM Modi : पंतप्रधान मोदींची विरोधकांवर कठोर शब्दांत टीका; पाहा Video

Marathi News Live Updates : सांगलीमध्ये ४० ते ५० जणांना भगरीच्या तांदळातून विषबाधा

SCROLL FOR NEXT