How To Check Fine on Your Vehicle In Maharashtra Saam Tv
देश विदेश

E-Challan : तुमच्या वाहनावर RTO चा किती दंड? 'या' ५ सोप्या स्टेप्सने घरबसल्या पाहा

How To Check Fine on Your Vehicle In Maharashtra : हे टाळण्यासाठी आपल्याला ई-चलान (E-Challan) ऑनलाईन कसे काढावे? हे माहित असणं गरजेचं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सिग्नल तोडणं असो किंवा ओव्हर स्पीड असो, अनेकदा आपण कळत-नकळत वाहतुकीचे नियम (Traffic Rules) मोडत असतो. आपल्या या चुकीला ट्रॅफिक पोलिसांकडून दंड आकारला जातो. पण, जेव्हा एखाद्या रस्त्यावर वाहतुक पोलीस कर्मचारी नसतात आणि अशावेळी जर आपण वाहतुक नियम मोडला तर त्यावरही आपल्याला आता ऑनलाईन दंड (Penalty) बसतो, आणि तो वेळेवर भरला नाही तर कोर्टाची पायरी चढावी लागते. हे टाळण्यासाठी आपल्याला ई-चलान (E-Challan) ऑनलाईन कसे काढावे? हे माहित असणं गरजेचं आहे. (How to check RTO e-Challan)

हे देखील पाहा -

जवळपास सर्वच मोठ्या शहरांमध्ये उच्च तंत्रज्ञानाच कॅमेरे लावलेले आहेत. जर आपण ट्रॅफिक नियम तोडला तर थेट आपल्या मोबाईलवर ई-चलान तत्काळ पाठवले जाते. याबाबत आपल्याला मेसेज आणि ईमेलवर माहितीही दिली जाते. पण अनेकदा आपल्याला असे ईमेल किंवा मेसेजे येत नाही. परिणामी दंड न भरल्यामुळे आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागते. हे टाळण्यासाठी आपण आपल्या वाहनाचं ई-चलान स्टेटस अधून-मधून तपासत राहणं गरजेचं आहे. त्यासाठी पाच सोप्या स्टेप्स जाणून घेऊयात.

तुमच्या वाहनावर किती दंड आहे? हे तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाहनाचा क्रमांक, वाहनाचा चेसिस क्र. किंवा वाहनाच्या इंजिनचा क्रमांक माहित असावा. यामुळे तुम्ही तुमच्या डेस्कटॉप किंवा मोबाईलवरुन तुमच्या वाहनावर असलेल्या दंडाची रक्कम सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकता.

या सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि जाणून घ्या तुमचे E-Challan Payment Status:

1) सर्वप्रथम आपल्या मोबाईल किंवा डेस्कटॉपच्या ब्राऊजरमध्ये हा यूआरएल टाकून https://mahatrafficechallan.gov.in या वेबसाईटवर जा.

2) यानंतर आपल्या वाहनाचा क्रमांक टाईप करा.

3) वाहनाचा क्र. टाईप केल्यानंतर चेसिस क्र. किंवा इंजिन क्रमांक या दोघांपैकी कोणत्याही एक निवडून त्यांच्या क्रमांकाचे शेवटचे चार क्रमांक टाईप करा.

4) यानंतर शेवटची स्टेप म्हणजे गुगल कॅप्चावर व्हेरिफाय करुन सबमिट करा.

5) सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमच्या वाहनाचे ई-चलान पीडीएफमध्ये डाऊनलोडही करु शकता.

तर अशाप्रकारे तुम्ही तुमच्या वाहनाचे ई-चलान स्टेटस घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने पाहू शकता आणि आपल्या दंडाची रक्कम ऑनलाईनच भरुन आपली संभाव्य दगदग टाळू शकता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT