Petroglyph: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभवात आणखी भर; ३५ हून अधिक कातळशिल्पांचा शोध

Petroglyphs Found In Sindhudurg : अनेक कातळशिल्पे चिरेखाणींमध्ये नष्ट होण्याची भिती या कातळशिल्पांचा शोध लावणारे अभ्यासक सतीश लळीत यांनी व्यक्त केली.
Petroglyphs Found In Sindhudurg
Petroglyphs Found In Sindhudurgविनायक वंजारे
Published On

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर घालणारी आणखी ३५ हून अधिक कातळशिल्पे (Petroglyph) उजेडात आली आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील कसालपासून अवघ्या दहा किलोमीटरवरील मालवण खोटले गावच्या धनगरवाडी सड्यावर (Sindhudurg) आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. मात्र या सर्व कातळशिल्पांचे अस्तित्व या परिसरातील चिरेखाणींमुळे धोक्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून अनेक कातळशिल्पे चिरेखाणींमध्ये नष्ट होण्याची भिती या कातळशिल्पांचा शोध लावणारे अभ्यासक सतीश लळीत (Satish Lalit) यांनी व्यक्त केली. (Further increase in the archeological splendor of Sindhudurg district More than 35 Petroglyph were discovered)

हे देखील पाहा -

या कातळशिल्पांमध्ये सहा मनुष्याकृती, तीन चतुष्पाद प्राणी, दोन मासे, गोलाकृती आणि अन्य १२ अमूर्त शिल्पे, एक शिल्पपट्ट किंवा मांड याचा समावेश आहे. यापैकी काही कातळशिल्पे झिजलेली असून काही अतिशय सुस्थितीमध्ये आहेत. अगदी सुरुवातीलाच २० फुट व्यासाचे एक वर्तुळाकृती कातळशिल्प नजरेला पडते. येथून अवघ्या काही फुटांवर एक मोठी चिरेखाण आहे. या ठिकाणाहून सुमारे अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर टेकडीच्या उतारावर झाडाझुडपांमध्ये एक सुस्पष्ट मानवाकृती दिसते. स्थानिक रहिवासी याला 'वेताळ' म्हणून ओळखतात. याठिकाणी वाघासारख्या प्राण्याची दोन चित्रे देखील अतिशय महत्वपूर्ण आहेत.

Petroglyphs Found In Sindhudurg
शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मिरी पंडितांकडे लक्ष द्या; राऊतांचा भाजपवर हल्ला

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जांभ्या दगडाच्या सडेपठारांवर आढळणारी ही कातळशिल्पे म्हणजे आदिमानवाच्या या परिसरातील वास्तव्याच्या पाऊलखुणा आहेत. या कातळशिल्पांची निर्मिती मध्याश्मयुग ते नवाश्मयुग (इसवीसनपूर्व २० ते १० हजार वर्षे) या काळात झाली असावी. या काळात मानव हा भटका शिकारी अवस्थेत होता. त्याला पशुपालन आणि शेतीचे ज्ञान नव्हते. कातळशिल्पे म्हणजे नेमके काय, त्यांचा कालावधी, ती कोरण्याचे उद्देश याबाबत संशोधन होण्याची गरज असून ही कातळशिल्पे केवळ जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्रासाठीही नक्कीच भुषणावह आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com