Indian Railways Saam Tv
देश विदेश

Indian Railways: एक ट्रेन तयार करण्यासाठी किती येतो खर्च? किंमत जाणून व्हाल थक्क...

Indian Railways News: भारतीय ट्रेन बनवण्यासाठी किती खर्च येतो? जर माहित नसेल तर आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून याबद्दल सांगणार आहोत.

Satish Kengar

रेल्वे हे भारतात प्रवासाचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं साधन आहे. दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वेचा उपयोग करतात. प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने देशभरात रेल्वेचं मोठं जाळं निर्माण केलं आहे. यामुळेच भारतीय रेल्वेला देशाची जीवनरेखा म्हटलं जातं.

प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वे मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर, राजधानी, शताब्दी इत्यादी गाड्या चालवत आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, भारतीय ट्रेन बनवण्यासाठी किती खर्च येतो? जर माहित नसेल तर आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून याबद्दल सांगणार आहोत.

भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये अनेक प्रकारचे डबे आहेत. यामध्ये जनरल, स्लीपर आणि एसी डब्यांचा समावेश आहे. यातच भारतीय रेल्वेला एक सामान्य डबा बनवण्यासाठी अंदाजे 1 कोटी रुपये खर्च येतो.

स्लीपर कोच बनवण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च येतो. याशिवाय एक एसी कोच बनवण्यासाठी सुमारे 2 कोटी रुपये खर्च येतो. तसेच भारतीय गाड्यांचे एक इंजिन बनवण्यासाठी एकूण खर्च सुमारे 18 ते 20 कोटी रुपये येतो.

यातच संपूर्ण ट्रेन तयार करण्यासाठी सुमारे 60 ते 70 कोटी रुपये खर्च येतो. भारतीय रेल्वे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या चालवते. प्रत्येक ट्रेनचा त्याच्या डिझाइननुसार बनवण्याचा खर्चही बदलतो.

20 कोच असलेल्या मेमू ट्रेनच्या (MEMU Train) निर्मितीसाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च येतो. याशिवाय 19 डब्यांची अमृतसर शताब्दी एलएचबी ट्रेन बनवण्यासाठी एकूण 60 कोटी रुपये खर्च येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati Chivda Recipe : 10 मिनिटांत बनवा उरलेल्या चपातीचा कुरकुरीत आणि चवदार चिवडा

भाजपने आणखी एक डाव टाकला, थेट आमदार फोडला, आज कमळ हातात घेणार?

Gold Rate Today: ऐन लग्नसराईत सोनं पुन्हा महागलं! १ तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

मोठी बातमी! महायुतीच्या मंत्र्याला कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, अटक वॉरंटबाबत अपडेट आली समोर

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

SCROLL FOR NEXT