Horrific Superstition in Haryana Saam TV news
देश विदेश

Superstition: अंधश्रद्धेचा कळस! तांत्रिकानं खोलीत नेलं अन् शौचालयाचं पाणी पाजून गळा दाबला; बाळासाठी महिलेचा बळी

Woman Killed in Name of Exorcism: आझमगडमधील अंधश्रद्धेच्या अमानुष प्रकारात एका भोंदूबाबाने तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलेची हत्या केली. तिला शौचालयाचं पाणी पाजून गळा आवळण्यात आला.

Bhagyashree Kamble

भारतात आजही विविध भागातून अंधश्रद्धेच्या घटना समोर येत आहेत. अंधश्रद्धेला बळी पडून भोंदूबाबाला 'मम' म्हणत आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या आझमगडमधून समोर येत आहे. एका भोंदूबाबाने तंत्र मंत्रच्या नावाखाली एका महिलेची हत्या केली आहे. भोंदूबाबाने आधी महिलेला शौचालयाचे पाणी पाजले नंतर तिचा गळा आवळून हत्या केली. यामुळे तिचा मृत्यू झाला. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हा संतापजनक प्रकार कंधारपूर पोलीस स्टेशन परिसरातील पहेलवानपूर गावातून उघडकीस आली आहे. अनुराधा (वय वर्ष ३५) असे मृत महिलेचं नाव आहे. तिचा विवाह १८ वर्षांपूर्वी नैपुरा गावातील रणजीत यादव यांच्याशी झाला होता. ती तिच्या पतीसोबत हरियाणामध्ये राहत होती. काही दिवसांपूर्वी तिच्या पतीने अनुराधाला माहेरी सोडलं. नंतर पुन्हा हरियाणाला परतला.

मुलबाळ होत नसल्यामुळे अनुराधाच्या आईनं तिला एका तांत्रिकाकडे नेलं. तांत्रिकाने अनुराधाला भूताने झपाटले असल्याची माहिती दिली. भूतबाधा दूर करण्यासाठी त्यानं एक लाख रूपयांची मागणी केली. अनुराधाच्या कुटुंबाने त्याला २२ हजार रूपये दिले. तांत्रिकाने रविवारी अनुराधाच्या कुटुंबाला फोन केला. नंतर अनुराधा आपल्या आईला घेऊन तांत्रिकाच्या घरी गेली. चार - पाच साथीदारांसह तांत्रिकाने विधी सुरू केली. त्यांनी अनुराधाचे केस ओढत मारहाण करण्यास सुरूवात केली.

नंतर तांत्रिकाने तिला शौचालय आणि गटारातील घाणेरडे पाणी पाजले. तसेच बराच वेळ तिचा गळा दाबून ठेवला. यामुळे अनुराधाची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मात्र तिला मृत घोषित केलं. त्यानंतर तांत्रिक अनुराधाचा मृतदेह घेऊन त्यांच्या घरी गेला आणि मृतदेह मंदिरासमोर ठेवला. त्यानं अनुराधाच्या आईला तिला थोड्या वेळात जाग येईल असं सांगितलं.

नंतर फरार झाला आणि काही दिवसानंतर तो पोलिसांसमोर शरण गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला असून, मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरूनपा तांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rules flouted by police: नियम धाब्यावर? एकाच बाईकवरून तीन पोलिसांचा प्रवास; Video Viral होताच लोक संतापले

Ambernath Politics: अंबरनाथच्या राजकारणाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा, भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली, शिंदेंनी डाव टाकला, काय घडलं?

Ind vs NZ playing 11 : न्यूझीलंडविरुद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? रोहित शर्मा, विराट कोहली खेळणार का? कोण बसेल बाकावर?

Maharashtra Live News Update: विक्रोळीत शॉपिंग सेंटरला जवळच्या मीटर बॉक्सला लागली भीषण आग

निवडणुकीनंतर भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह,राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT