Pune Crime: दीर वहिनीचं सूत जुळलं, नवरा 'कबाब मैं हड्डी'; धारदार शस्त्राने सख्ख्या भावाला संपवलं

Man Kills Brother Over Illicit Affair With Sister-in-law: पुण्यातील दिघी परिसरात दीर-वहिनीच्या अनैतिक संबंधातून सख्ख्या भावाचा खून करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Man Kills Brother Over Illicit Affair With Sister-in-law
Man Kills Brother Over Illicit Affair With Sister-in-lawSaam tv news
Published On

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही

पुण्यातून दीर वहिनीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून भावानेच भावाचा काटा काढला आहे. डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी तपास करीत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सोमनाथ दादा लकडे (वय वर्ष १९) आणि शितल लकडे (वय वर्ष २५) असे आरोपींची नावे आहेत. तर, धनु लकडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तिघेही पिंपरी चिंचवड शहरातील दिघी पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. सोमनाथ आणि शितल या दोघांचे अनैतिक संबंध होते.

Man Kills Brother Over Illicit Affair With Sister-in-law
Beed: दहावीच्या मुलीची भररस्त्यात छेड; पालकांनी टवाळखोराला शिकवली अद्दल

धनु लकडे हा शितलचा नवरा होता. तर, सोमनाथ हा धनुचा सख्खा भाऊ होता. सोमनाथ आणि शितलचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र, धनु त्यांच्या प्रेमात अडसर ठरत होता. दरम्यान, शितल आणि सोमनाथ या दोघांनी मिळून धनुचा काटा काढण्याचा प्लॅन रचला. प्लॅननुसार, सोमनाथने धनुच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलीस तपासात अनैतिक संबंधातून धनुची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी, सोमनाथ लकडे आणि शितल लकडेविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे.

Man Kills Brother Over Illicit Affair With Sister-in-law
'..यांना एकत्र येऊ देऊ नका' मीरा भाईंदरमध्ये मराठी आंदोलकांची धरपकड; गुजराती-मारवाडी चिडवत होते | Marathi Morcha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com