Madhya Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: कार -दुचाकीची समोरासमोर धडक, चौघांचा जागीच मृत्यू; गावावर कोसळला दु:खाचा डोंगर

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला. भरधाव कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

Priya More

Summary -

  • मध्यप्रदेशातील कटनी जिल्ह्यात भीषण रस्ते अपघात

  • कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक

  • अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले

  • अपघातात दुचाकीचा चुराडा

मध्यप्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यात ही अपघाताची घटना घडली. भरधाव कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. अपघातामध्ये दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या चौघांचा जागीचा मृ्त्यू झाला. या अपघातामध्ये कारचालकासह ३ जण जखमी झाले आहेत. बडवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे पुलावर हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीचा चुराडा झाला. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चौघेजण कटनीवरून उमरिया येथे दुचाकीवरून जात होते. राष्ट्रीय महामार्ग -७८ वरून ते प्रवास करत होते. त्याचवेळी बडवारा येथील रेल्वे पुलाजवळ एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती दुचाकीवरील चौघेजण दूरवर फेकले गेले. या अपघातामध्ये चौघेजण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या अपघातामध्ये जखमी झालेल्या ७ जणांना तात्काळ रुग्णालयात हलवले. पण डॉक्टरांनी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या चौघांनाही मृत घोषीत केले.

रामकिशोर सिंह, रामदास सिंह, जितेंद्र सिंह आणि इंद्रभान सिंह या चौघांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. या अपघातामध्ये कार चालकासह ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालक अंबिकापूरहून राजगडला जात होता. पोलिसांनी या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur : बदलापूरकरांसाठी गुड न्यूज! घरपट्टीत ५०% सवलत

Sandesh Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा बंगाली स्टाईल स्वादिष्ट संदेश, वाचा सोपी रेसिपी

Summer Drink : उन्हाळ्यात घरीच बनवा 'हे' थंडगार ड्रिंक, अवघ्या १० मिनिटांत होईल तयार

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील कमर्शियल गॅस वितरण बंद

Actress Sandel: भररस्त्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मारली कानाखाली, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT