Goa Saam
देश विदेश

Death: हनिमूनसाठी गोव्याला निघाले, बायकोला तहान लागली अन् नवरा स्टेशनवर उतरला; पण ट्रेन पकडताना ट्रेनखाली चिरडला

Train Accident: हनिमुनसाठी गोव्याला जाणाऱ्या नवविवाहित तरूणाचा रेल्वे पकडताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यात तरूणाचा मृत्यू झाला आहे.

Bhagyashree Kamble

हनिमुनसाठी गोव्याला जाणाऱ्या नवविवाहित तरूणाचा रेल्वे पकडताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यात तरूणाचा मृत्यू झाला आहे. जोडपं तेलंगणा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. सिकंदराबाद स्टेशनवर वधूला तहान लागली होती. तहान लागली असल्यामुळे तिने नवऱ्याला पाणी आणायला सांगितलं. पाणी आणण्यासाठी नवरा स्टेशनवर उतरला. पण ट्रेन अचानक चालू झाली आणि ट्रेन पकडण्याच्या घाईत तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्म मध्ये पडला. यात त्याचा मृ्त्यू.

उराकोंडा साई (वय वर्ष २८) असे मृत तरूणाचे नाव आहे. हनिमूनसाठी पत्नी आणि नातेवाईकांसह त्याने वास्को द गामा एक्सप्रेसने गोव्याला जाण्याचा प्लान आखला होता. सर्व काही नियोजनानुसार चालले होते. सिकंदराबाद स्टेशनवर त्याच्या बायकोला तहान लागली. तिने नवऱ्याला पाण्याची बाटली आणायला सांगितले होते. उराकोंडा साई पाण्याची बाटली आणण्यासाठी सिंकदराबाद स्टेशनवर उतरला.

पाण्याची बाटली घेतली. मात्र, ट्रेन अचानक सुरू झाली. साईने धावत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. पण धावत असताना त्याचा पाय घसरला. तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध पडला. स्टेशन आणि ट्रेनमधील लोकांनी तातडीने गंभीर अवस्थेत असलेल्या साईला रूग्णालयात नेले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर बायको आणि कुटुंबातील सदस्यांनी एकच हंबरडा फोडला.

कुटुंबातील सदस्य आणि प्रत्यक्षदर्शींचा आरोप आहे की ट्रेन सुरू होण्यापूर्वी कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. ट्रेन अचानक सुरू झाली. या घटनेनंतर स्टेशनवर घोषणांचा अभाव आणि सिग्निलमधील त्रुटी यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने अद्याप कोणतीही बाजू स्पष्ट केलेली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंवर सोपवली मोठी जबाबदारी; विदर्भात भाजपचं टेन्शन वाढणार?

Mumbai Tourism: मुंबईजवळचं महाबळेश्वरसारखं थंडगार वातावरण अनुभवायचं? मग 'हे' 80 किमी अंतरावरचं ठिकाण पाहाच

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT