Sex Racket Bust News Saam Tv
देश विदेश

५२ पुरुष अन् १० महिला रिसॉर्टवर नको त्या अवस्थेत आढलल्या, ते दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Uttarakhand luxury resort prostitution racket busted : उत्तराखंडमधील नैनीतालजवळील एका आलिशान रिसॉर्टवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून कथित देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला. कारवाईदरम्यान ५२ पुरुष, एका अल्पवयीन मुलीसह १० महिलांना ताब्यात घेण्यात आले.

Namdeo Kumbhar

Sex Racket Bust News : उत्तराखंडमधील नैनीताल (रामनगर) येथील एका नामांकित रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाइल देहव्यापार आणि दारू पार्टीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सांवल्दे येथील 'एक्रोन रिसॉर्ट'वर शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी अचानक धाड टाकली. या कारवाईत ५२ पुरुष आणि एका अल्पवयीन मुलीसह १० महिलांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

पोलिसांची चाहूल लागताच रिसॉर्टचा जनरल मॅनेजर (GM) तिथून फरार झाला असून, पोलिसांनी रिसॉर्ट तात्काळ सील केले आहे. याप्रकरणी फरार जीएमसह सर्व आरोपींवर पॉक्सो (POCSO) आणि देहव्यापार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या रिसॉर्टमध्ये इतर राज्यांतून तसेच परदेशातून महिलांना आणून हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवले जात होते. छापा टाकला तेव्हा आरोपी दारू आणि ड्रग्जच्या (अमली पदार्थ) नशेत धुंद होऊन पार्टी करत होते. यावेळी महिलांना अश्लील नृत्य करण्यास भाग पाडले जात होते आणि त्यांच्यावर पैशांची उधळण सुरू होती. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह साहित्य आणि महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत.

दोन दिवसांसाठी २.२० लाखांत बुक केले होते रिसॉर्ट

या संपूर्ण काळ्या धंद्याचा मुख्य सूत्रधार मेरठचा रहिवासी उमेंद्र कुमार असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा केला. उमेंद्र कुमार याच्या कीटकनाशक निर्मिती कंपनीशी (Pesticide Manufacturing Company) संबंधित लोकांच्या करमणुकीसाठी ४ आणि ५ जुलै रोजी हे रिसॉर्ट तब्बल २ लाख २० हजार रुपयांना बुक करण्यात आले होते. तसेच पार्टीत आणलेल्या प्रत्येक महिलेला अंदाजे १०,००० रुपये देण्याचे ठरले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT