नवी दिल्ली : ऐन हिवाळ्यात पावसाने दिल्लीकरांना झोडपून काढलं आहे. आज शुक्रवारी कोसळलेल्या पावसाने दिल्लीकरांची दाणादाण उडवली आहे. दिल्लीत एनसीआर भागात कोसळलेल्या पावासाने शहरात रस्त्यावर गुडघाभर साचलं आहे. ऐन हिवाळ्यात पावसाच्या एन्ट्रीने दिल्लीकरांना घरात ठेवलेल्या छत्र्या पुन्हा बाहेर काढाव्या लागल्या आहेत.
दिल्लीत शुक्रवारी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पावसांची संततधार पाहायला मिळाली. दिल्लीकरांना जवळपास दोन तासांहून अधिक वेळ पावसाने झोडपलं. हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवारी देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे. दिल्लीतील नोएडा, गाजियाबाद, गुडगाव भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. अचानक पावसाने एन्ट्री केल्याने दिल्लीकरांची चिंता वाढली आहे.
हवामान विभागने २७ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत संपूर्ण दिल्लीत एनसीआरमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरात धुकेही वाढले आहेत. रात्री आणि सायंकाळच्या प्रवास करणाऱ्यांना हवामान विभागाने सावध केलं आहे. तसेच सकाळी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. दिल्ली एनसीआरमध्ये कमाल तापमान १९ ते २० डिग्री सेल्सिअस ते किमान तापमान १० ते १३ डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. दोन दिवसाच्या पावसानंतर दिल्लीतील तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राताली नंदुरबार जिल्ह्यात काकळदा परिसरात तुफान पाऊस सुरु आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून काकळदा परिसरात जोरदार बॅटिंग केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या यलो अलर्टनंतर जोरदार पाऊश सुरु झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची अचानक धावपळ उडाली. अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसामुळे आंब्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.