
संसद भवनाजवळ एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडलीय. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. आत्महत्येचा प्रयत्न करणारा व्यक्ती गंभीरपणे होरपळलाय. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलंय.
या व्यक्तीने जेथे स्वत:ला पेटवून घेतलं होतं तेथे पोलिसांना पेट्रोलही सापडले आहे. या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याचं कारण अद्याप कळू शकलेले नाहीये. तपासासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचलीय. दरम्यान पोलिसांना घटनास्थळावरून अर्धी जळालेली 2 पानांची चिठ्ठी सापडलीय. पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतलीय. आगीत जखमी झालेल्या व्यक्तीला ब्लँकेटने झाकण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने रेल्वे भवनजवळील उद्यानात स्वतःला पेटवून घेतले. त्यानंतर ते संसद भवनाच्या दिशेने धावू लागले. दिल्ली पोलिसांच्या मते, हे प्रकरण बागपतमधील कोणाशी तरी वैयक्तिक वैमनस्यातून असावे. दरम्यान पुढील तपास सुरू आहे.
स्वत:ला पेटवून घेणाऱ्या व्यक्तीची ओळख पटलीय. उत्तर प्रदेशातील बागपत येथील रहिवासी असून त्याचे नाव जितेंद्र आहे. रेल्वे भवन चौकात स्वतःला पेटवून घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी काही नागरिकांसह तातडीने आग शमवली आणि व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले.
डीसीपी देवेश कुमार महला यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलीय. "आज यूपीमधील बागपतमध्ये राहणारा जितेंद्र नावाच्या व्यक्तीने रेल्वे भवनच्या चौकात आत्महत्येचा प्रयत्न केला. काही नागरिकांसह पोलीस हवालदारांनी तातडीने आग शमवली. आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, तो रेल्वे भवनच्या चौकात आहे. उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला अद्यापही रुग्णालयात पाठवण्यात आलेले नाहीये, डीसीपी म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.