Pratap Sarangi: संसदेमध्ये भाजपचे खासदार जखमी; राहुल गांधींवर आरोप, नेमकं काय घडलं?

MP Pratap Sarangi Injured In Parliament: आज संसदेत सत्ताधारी आणि विरोध पक्षांमध्ये बाचाबाची झाली. यामध्ये भाजपचे खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी दुखापत झाली आहे.
Pratap Sarangi
Pratap SarangiSaam Tv
Published On

आज संसदेबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाली. अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, असा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्याच पार्श्वभूमीवर आज संसदेत विविध पक्षांनी आंदोलन केले. याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याने त्यांना दुखापत झाली असल्याचा आरोप भाजपचे खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी केला आहे.

Pratap Sarangi
Rahul Gandhi: मला अडवलं, धक्काबुक्की केली आणि संसदेत जाऊन दिलं नाही ; राहुल गांधींचा भाजप खासदारांवर आरोप

प्रतापचंद्र सारंगी यांनी म्हटलंय की, ते पायऱ्यांवर उभे होते. तेव्हा दुसरे खासदार त्यांच्या अंगावर पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. यानंतर त्यांना उपचारासाठी लगेल रुग्णालयात नेण्यात आले. याशिवाय भाजप खासदार मुकेश राजपूतहेदेखील जखमी झाले आहेत. (0

भाजप खासदारांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी एका खासदाराला धक्का दिला. ते माझ्यावर पडले. त्यामुळे मी खाली पडलो. यामुळेच मला दुखापत झाली आहे.

प्रताप सारंगी यांचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ते व्हील चेअरवर बसले आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झालेली दिसत आहे त्यामुळे ते रुमालाने झाकलेले दिसत आहे.

Pratap Sarangi
Mallikarjun Kharge on Amit Shah: अमित शहांच्या 'त्या' वक्तव्यावरून मल्लिकार्जुन खरगे आक्रमक; केंद्र सरकारकडे केली मोठी मागणी

राहुल गांधी काय म्हणाले?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील या संपूर्ण घटनेवर मत मांडले आहे. ते म्हणाले की, मी संसदेत जाण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा भाजप खासदारांना मला अडवले, धक्काबुक्की केली आणि धमकावलेदेखील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनादेखील धक्काबुक्की केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

Pratap Sarangi
Amit Shah Statement : 12 सेकंदाच्या क्लिपद्वारे दिशाभूल करू शकत नाही, आंबेडकर आमच्यासाठी पूजनीय: रिजिजू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com