Rahul Gandhi: मला अडवलं, धक्काबुक्की केली आणि संसदेत जाऊन दिलं नाही ; राहुल गांधींचा भाजप खासदारांवर आरोप

Rahul Gandhi On Amit Shah: काल संसदेत अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर देशासह राज्यात विरोध पक्षांनी आंदोलने केली आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSaam Tv
Published On

अमित शहा यांना काल सभागृहात चर्चेदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप विरोधकांना केला आहे. अमित शहांच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहे. दिल्लीसह राज्यातही याचे पडसाद पाहायला मिळत आहे. दिल्लीत संसदेबाहेर काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केले आहे तर राज्यात विरोधी पक्षांनी विधानपरिषदेबाहेर आंदोलन केले आहे. दरम्यान, भाजपच्या खासदारांनी मला धक्काबुक्की केले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधीसह प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांची संसदेबाहेर अमित शहा यांच्याविरोधात आंदोलन केले आहे. यावेळी राहुल गांधीना संसदेत जाण्यापासून भाजपच्या खासदारांनी अडवले असल्याचा आरोप केला आहे. (Rahul Gandhi News)

Rahul Gandhi
Amit Shah Statement : 12 सेकंदाच्या क्लिपद्वारे दिशाभूल करू शकत नाही, आंबेडकर आमच्यासाठी पूजनीय: रिजिजू

राहुल गांधी यांनी सांगितले की, भाजपचे जे खासदार आहेत ते संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ मला अडवण्याचा प्रयत्न करत होते. ते मला अडवत होते, ढकलत होते आणि धमकावतदेखील होते.पण ठिके, धक्काबुक्कीमुळे आम्हाला काही होत नाही.हा संसदेचा प्रवेशद्वार आहे. संसदेत जाणे हा आमचा अधिकार आहे तरीही भाजपचे खासदार आम्हाला आतमध्ये जाण्यापासून अडवत होते.संसदेत संविधानावर आक्रमण करत आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. (Rahul Gandhi Reaction)

Rahul Gandhi
Amit Shah: काँग्रेस आंबेडकरविरोधी, आरक्षणविरोधी पक्ष; खरगेंच्या आरोपांवर अमित शहा यांचा घाणाघात

दरम्यान, दिल्लीसह राज्यातही अमित शहा यांच्याविरोधात आंदोलन सुरु आहे.अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राज्यात आदित्य ठाकरे आणि विरोध पक्षातील आमदारांनी विधान परिषदेबाहेर आंदोलन केले आहे. देशात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. विरोधी पक्षनेते अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

Rahul Gandhi
Mallikarjun Kharge on Amit Shah: अमित शहांच्या 'त्या' वक्तव्यावरून मल्लिकार्जुन खरगे आक्रमक; केंद्र सरकारकडे केली मोठी मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com