रविकांत तुपकरांचे आंदोलन चिघळले; एकाने केला आत्मदहनाचा प्रयत्न!

तुपकरांनी त्यांच्या निवास स्थानी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवले आहे. आज चार दिवस झाले अजून पर्यंत राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही.
रविकांत तुपकर
रविकांत तुपकरSaamTvnews संजय जाधव
Published On

बुलढाणा : सोयाबीन व कापूस मालाला योग्य भाव मिळावा यासाठी नागपूर येथील संविधान चौकात स्वाभिमानी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बेमुदत अन्न त्याग आंदोलन सुरू केले होते. दुसऱ्याच दिवशी नागपूर पोलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेऊन तेथील आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.

हे देखील पहा :

तुपकरांना नागपूर पोलिसांनी बुलढाणा येथील त्यांच्या निवासस्थानी आणून सोडले. मात्र, तुपकरांनी त्यांच्या निवास स्थानी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवले आहे. आज चार दिवस झाले अजून पर्यंत राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकरी बांधव रस्त्यावर उतरले, आज असंख्य ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

रविकांत तुपकर
बीड-पिंपळनेर-नाथापूर रस्ता करा अन्यथा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार!

आता चक्क स्वाभिमानच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष रफिक शेख यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी रफिक शेख यांना ताब्यात घेतले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com