Nandurbar Red Chilli Market : नंदुरबार बाजार समितीत ओली लाल मिरचीची आवक तेजीत

Nandurbar News : राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्हा मानला जात असतो. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीच्या खरेदी विक्रीसाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती आहे.
Nandurbar Red Chilli Market
Nandurbar Red Chilli MarketSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली जात असते. यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस आणि मिरची पिकांवर आलेल्या रोगराईमुळे मिरचीच्या उत्पादनात प्रचंड अशी घट आली आहे. मात्र मागील तीन ते चार दिवसापासून नंदुरबार बाजार समितीत ओली लाल मिरचीची आवक चांगलीच वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे.  

राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्हा मानला जात असतो. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीच्या खरेदी विक्रीसाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती आहे. येथे मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जात असते. नंदुरबार बाजार समितीमध्ये दररोज साधारण ३०० ते ४०० मिरची घेऊन वाहने दाखल होत असतात. 

Nandurbar Red Chilli Market
Beed Accident : बसची दुचाकीला धडक; दोनशे फुटापर्यंत नेले फरफटत, अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू

मिरचीची आवक वाढली 

मागील आठवड्यापर्यंत मिरचीची आवक कमी होती. यामुळे आवक वाढणार कि नाही या चिंतेत व्यापारी होता. दरम्यान बाजार समितीत मिरचीची आवक वाढण्यास आता सुरवात झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली ओली लाल मिरची पथार्‍यांवर वळविण्यात येत आहे. मिरचीची आवक वाढल्याने ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

Nandurbar Red Chilli Market
Shahapur Durga Mata Temple : शहापूर येथील दुर्गा माता मंदिरात चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला

किंमतही स्थिर 

नंदुरबारमध्ये मिरची खरेदीसाठी स्वतंत्र बाजारपेठ आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक होत असून उत्पादक शेतकऱ्यांना याठिकाणी मिरचीला चांगला भाव देखील मिळत असतो. मागील आठवड्याच्या तुलनेत मिरचीची आवक वाढल्याने दरात देखील काहीशी वाढ झाली आहे. सध्या मिरचीचे दर स्थिर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com