Beed Accident
Beed AccidentSaam tv

Beed Accident : बसची दुचाकीला धडक; दोनशे फुटापर्यंत नेले फरफटत, अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू

Beed news : गेवराईच्या अर्ध पिंपरी याठिकाणी जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते. ते आपल्या गावालगत असलेल्या क्रिकेट मैदानावर रोज क्रिकेट खेळण्यासाठी जात नेहमीप्रमाणे आज सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी गेले
Published on

बीड : भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराला दुचाकीसह बसने जवळपास २०० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले होते. यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर महामार्गावर नागरिकांची गर्दी जमली होती. 

बीडच्या गेवराई- शेवगाव राज्य महामार्गावरील महार टाकळी येथे सदरची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात महारटाकळी (ता. गेवराई) येथील फय्याज खान (वय ४५) असे मृत झालेल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचे नाव आहे. फैय्याज खान हे गेवराईच्या अर्ध पिंपरी याठिकाणी जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते. ते आपल्या गावालगत असलेल्या क्रिकेट मैदानावर रोज सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी जात होते. 

Beed Accident
Onion Price : कांद्याच्या दरात घसरण कायम; खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत

दरम्यान नेहमीप्रमाणे आज देखील सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. क्रिकेट खेळून झाल्यानंतर ते घराकडे जाण्यासाठी निघाले होते. याच वेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या माजलगाव- पुणे या राज्य परिवहन महामंडलियाच्या बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात शिक्षक फय्याज खान जागीच ठार झाले. 

Beed Accident
Solar Pump : शेकडो शेतकरी कृषिपंपाच्या प्रतीक्षेत; पंप मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी वर्षभरापूर्वी भरली १० टक्के रक्कम

दरम्यान अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. तर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चकलांबा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. अपघात झाल्यामुळे महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. दरम्यान पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com