Haryana Accident Saam TV
देश विदेश

Haryana Accident : प्रवाशांनी भरलेल्या बसला ट्रकची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू २५ जखमी

Haryana Truck and Bus Accident : या अपघातात ७ व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. तर २५ जण जखमी झाले आहेत. दिल्ली-जम्मू नॅशनल हायवेवर ही दुर्घटना घडली आहे.

Ruchika Jadhav

हरियाणामध्ये अपघाताची एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ट्रक आणि एका मिनी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ७ व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. तर २५ जण जखमी झाले आहेत. दिल्ली-जम्मू नॅशनल हायवेवर ही दुर्घटना घडली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील होत्या. तसेच मिनी बसमधून सर्व प्रवाशी वैष्णव देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र देवीच्या पायथ्याशी पोहचण्याआधी वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, हा अपघात बसमधील वाहन चालकामुळे झाल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. येथील प्रवासी शिवानीने म्हटलं की, "वाहन चालक दारू पिऊन नशेमध्ये बस चालवत होता. बसमधून ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत होते. रात्रीचीवेळ असल्याने आम्ही झोपलो होतो. उठलो तेव्हा हा भीषण अपघात झाला होता. नेमकं काय घडलं हे आम्हाला सुरुवातीला समजलंच नाही. नंतर सर्वजण जखमींना आणि मृतांना बाहेर काढण्यासाठी धावले."

सदर अपघात इतका भीषण होता की बसचा आणि ट्रकचा पूर्णत: चक्काचूर झाला आहे. अपघात घडल्याने रात्रीच्यावेळी रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडील झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा येथे लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल केले. यासह अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

SCROLL FOR NEXT