Akola News: अकोल्यात रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, एका महिलेसह चिमुकलीचा जागीच मृत्यू

Akola Accident News: अकोल्यात ऑटो रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एका महिलेसह चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर-कारंजा रस्त्यावरील तुरखेड फाट्याजवळील डॉ. कांबे यांच्या डेंटल कॉलेज समोर हा अपघात झालाय.
अकोल्यात रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, एका महिलेसह चिमुकलीचा जागीच मृत्यू
Akola Accident NewsSaam Tv

अक्षय गवळी, साम टीव्ही, अकोला प्रतिनिधी

अकोल्यात ऑटो रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एका महिलेसह चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर-कारंजा रस्त्यावरील तुरखेड फाट्याजवळील डॉ. कांबे यांच्या डेंटल कॉलेज समोर हा अपघात झालाय. या अपघातात महिलांचा आणि 3 वर्षीय मुलीचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

उजावंती विश्राम जाधव (वय 40) आणि दिव्या अजय पवार (वय 3) यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातात ऑटो चालक अमर सुरेश फुलझेले (वय 35), विश्राम सुरेश जाधव (वय 50) आणि दीनानाथ रामराव पवार (वय 12) हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की ऑटोचा अक्षरशा चूराळा झालाय.

अकोल्यात रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, एका महिलेसह चिमुकलीचा जागीच मृत्यू
Sixth Phase Voting : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याच्या प्रचाराला लागला ब्रेक, कन्हैया कुमारसह या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेर्डा येथून मुर्तीजापुरकडे प्रवासी घेऊन येणारा ऑटो क्रमांक एमएच 37 जी 572 हा मुर्तीजापुरकडून कारंजाकडे जात असलेल्या कार क्रमांक एमएस 37 वी 5210 या गाडीला समोरासमोर धडकला. कार चालक मद्य प्राशन करून गाडी चालवत असल्याचे स्थानिक लोकांनी पोलिसांना सांगितले. त्याच्या खिशात दारुची बाटली देखील सापडली आहे. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तर मृत हे ऑटोरिक्षातील प्रवासी असून महिलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

हिंगणा उड्डाणपुलावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात

दरम्यान, अकोला-पातूर रस्त्यावरील हिंगणा उड्डाणपुलावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. अपघात दुचाकीवरील दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय. तर आई वडील हे जखमी झाले आहे. दरम्यान, अपघात झाल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करीत असलेल्या ट्रक चालकाने दुसऱ्या ट्रकला देखील धडक दिली.

अकोल्यात रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, एका महिलेसह चिमुकलीचा जागीच मृत्यू
Sharad Pawar: बारामतीच्या विजयावर शरद पवार ठाम? विधानसभेतही रंगणार पवार विरूद्ध पवार सामना?

ट्रक आणि ट्रकच्या अपघातात दोन्ही ट्रकचे वाहक जखमी़ झाले. सद्यस्थित ट्रकमध्ये वाहन चालक अडकले असून त्यांना बाहेर काढ़ण्याचे प्रयत्न सुरू आहे, तसेच अपघातानंतर महामर्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचेही काम सुरू आहे. अकोल्यातल्या चांदुर गावाजवळून जाणाऱ्या नव्या महामार्गावर आज रात्री हां अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच जूने शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com