Sharad Pawar: बारामतीच्या विजयावर शरद पवार ठाम? विधानसभेतही रंगणार पवार विरूद्ध पवार सामना?

Lok Sabha Election 2024: साऱ्या देशातली सर्वात लक्षवेधी लढत ठरली ती बारामती लोकसभा मतदारसंघाची. कारण थेट पवार काका-पुतण्यात वर्चस्वाची लढाई रंगली होती. आता मतदानानंतर चर्चा सुरू झालीय ती विजय आणि पराभवाची....काका मैदान मारणार की पुतण्या याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.
बारामतीच्या विजयावर शरद पवार ठाम? विधानसभेतही रंगणार पवार विरूद्ध पवार सामना?
Sharad Pawar And Supriya SuleSaam Tv

विनोद पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

साऱ्या देशातली सर्वात लक्षवेधी लढत ठरली ती बारामती लोकसभा मतदारसंघाची. कारण थेट पवार काका-पुतण्यात वर्चस्वाची लढाई रंगली होती. आता मतदानानंतर चर्चा सुरू झालीय ती विजय आणि पराभवाची....काका मैदान मारणार की पुतण्या याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय. मात्र मतदानाच्या दोन आठवड्यानंतर पवारांना विजयाची चाहूल लागलीय. शरद पवार म्हणाले आहेत की, ''विजय मिळायला काही हरकत नाही, तसं लोकं म्हणतायत.''

मात्र बारामतीत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाल्याचा आरोप पवारांनी केलाय. त्यामुळे याचा निकालावर किती परिणाम होईल हे सांगायलाही पवार विसरले नाहीत. पार म्हणाले आहेत की, निवडणुकीत पैशांचा वापर झाला. त्याचा परिणाम किती होईल सांगता येत नाही.

बारामतीच्या विजयावर शरद पवार ठाम? विधानसभेतही रंगणार पवार विरूद्ध पवार सामना?
Maharashtra Lok Sabha: संकटमोचकालाच टेंशन? भाजपच्या पॉकेट्समध्येच कमी मतदान? नाशिक, दिंडोरीत बूथनिहाय रिपोर्ट मागवला

बारामती लोकसभेत रंगलेला काका-पुतण्याचा सामना पुन्हा विधानसभेतही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे बारामतीत आतातपासूनच ठाण मांडून आहे. त्यांनी बारामीततल्या जनतेशी भेटीगाठीही वाढवल्या आहेत. मात्र निवडणूक लढवण्याबाबत त्यांनी पॉलिटीकल उत्तर दिलं. युगेंद्र पवार म्हणाले आहेत की, विधानसभा अजून लांब आहे. त्याबाबत विचार केला नाही.

मात्र पवार कुटुंबातलं हेच चित्र विधानसभेत दिसेल का याबाबत शरद पवारांनी सावध प्रतिक्रिया दिलीय. लोकसभेचं चित्र काय असणार यावर बारामतीचा उमेदवार अंबलंबून असेल, असं सांगत याबाबतचा संस्पेंस वाढवलाय. शरद पवार म्हणाले की, विधानसभेबद्दल आताच नाही सांगता येणार. लोकसभेचं चित्र काय असेल त्यावर अंवलंबून आहे.

बारामतीच्या विजयावर शरद पवार ठाम? विधानसभेतही रंगणार पवार विरूद्ध पवार सामना?
Dombivli MIDC Fire Update: डोंबिवली कारखान्यातील बॉयलरला नव्हती परवानगी, कामगार विभागाची धक्कादायक माहिती; मृतांची संख्या वाढली

मोदी-शाहांपासून सर्वच राजकारणी सांगतात की पवारांना राजकारणाची हवा कळते. त्यामुळे पवारांनी सुळेंच्या विजयावर आणि विधानसभेच्या बारामतीतल्या उमेदवारावर थेट बोलणं टाळलं. त्यामुळे बारामतीच्या मैदानात पवारांनी नेमक्या काय करामती केल्या आहेत, हे चार जूनलाच कळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com