Haryana Political Crisis Saam Tv
देश विदेश

Haryana Politics: हरियाणात भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी सोडली साथ; सरकार अल्पमतात येणार?

Haryana Political Crisis: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठा धक्का बसला आहे. तीन अपक्ष आमदारांनी मंगळवारी जाहीर केले की, त्यांनी नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा काढून घेतला आहे.

Satish Kengar

Haryana News:

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठा धक्का बसला आहे. तीन अपक्ष आमदारांनी मंगळवारी जाहीर केले की, त्यांनी नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा काढून घेतला आहे. सोंबीर सांगवान, रणधीर गोलेन आणि धरमपाल गोंडर म्हणाले की, त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष उदय भान यांच्या उपस्थितीत रोहतक येथे पत्रकार परिषदेत तीन अपक्ष आमदारांनी ही घोषणा केली. यावेळी रणधीर गोंडर म्हणाले, आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत आणि काँग्रेसला पाठिंबा देत आहोत. शेतकऱ्यांसह अनेक प्रश्नांबाबत हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री नायबसिंग सैनी?

तीन अपक्ष आमदारांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेणतल्यानंतर पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला. यावर नायब सिंह सैनी म्हणाले, “मला याबाबत माहिती मिळाली आहे. आता काँग्रेस काही लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यात व्यस्त असण्याची शक्यता आहे. काँग्रेसला जनतेच्या इच्छेशी काही देणे घेणे नाही.''

सरकार अल्पमतात?

दरम्यान, 90 सदस्यीय हरियाणा विधानसभेत सध्या 88 आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी विधानसभेचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याशिवाय हिसारमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे रणजित चौटाला यांनीही आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात भाजपच्या विद्यमान आमदारांची संख्या चाळीस आहे. भाजपला सध्या हरियाणात दोन अपक्ष आणि एक हलोपाचे आमदार गोपाल कांडा यांचा पाठिंबा आहे. विरोधकांबद्दल बोलायचे झाले तर राज्यात विरोधी पक्षांच्या एकूण आमदारांची संख्या 45 आहे, त्यात काँग्रेसचे 30 आणि जेजेपीचे 10 आमदार आहेत. यातच तीन अपक्ष आमदारांनी आपला पाठिंबा काढून घेतल्याने भाजप सरकारने बहुमत गमावलं आहे.

काँग्रेस अविश्वास प्रस्ताव आणू शकते का?

मार्च 2024 मध्ये काँग्रेस पक्षाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव आणला होता. यामुळे ते पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणू शकत नाही. दोन अविश्वास प्रस्तावांमध्ये सहा महिन्यांचा कालावधी असणं गरजेचं असतं. यामुळे काँग्रेस पक्ष नायब सिंह सैनी सरकारविरोधात सप्टेंबर महिन्याआधी अविश्वास प्रस्ताव आणू शकत नाही. यातच हरियाणामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

SCROLL FOR NEXT