Rupali Chakankar: EVM ची केली पूजा, रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rupali Chakankar
Rupali ChakankarSaam Tv

Lok Sabha Election Third Phase:

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदान केंद्रात धार्मिक विधी करण्यास कायद्यानं मनाई आहे. मात्र रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम पैजा केल्याने त्यांच्याविरुद्ध पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

Rupali Chakankar
EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, रूपाली चाकणकर यांनी आज सकाळी ईव्हीएम मशीनची पूजा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी यांनी चाकणकर यांच्याविरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.

रूपाली चाकणकरांना वेड्याच्या दवाखान्यात पाठवा: संध्या सव्वालाखे

दरम्यान, रुपाली चाकणकर यांचा ईव्हीएमची पूजा करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने यावर टीका केली आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देतानाकाँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे म्हणाल्या की, राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना तात्काळ वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा. चाकणकर यांनी ज्या पद्धतीने ईव्हीएम मशीनची पूजा केली. मागच्या वेळी आपल्या आयोगाच्या कार्यालयातून पक्षाचा प्रचार केला होता तेव्हा त्यांची किंव आली होती. दडपणाखाली असे केले असेल. मात्र आता खरोखरच डोक्यात फरक पडला आहे. त्यांच असे वागणे म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात सारखेच आहे.

Rupali Chakankar
Maharashtra Politics: निवडणूक रोखे योजनेत मोठा भ्रष्टाचार, भाजपकडून त्याच पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर: पृथ्वीराज चव्हाण

त्या म्हणाल्या, पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभण्यासारखे नाही. भविष्यात आयोगाकडे एखादी महिला दात मागण्यासाठी गेल्यास तिला न्याय मिळणार की, नाही? त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ दखल घेऊन त्यांची या पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com