Madha Lok Sabha Politics : शिंदे गटाला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का; माढा लोकसभा संपर्क प्रमुखांचा पक्षाला सोडचिठ्ठी

Loksabha Election 2024 : माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. संजय कोकाटे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam TV

Political News :

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. नाराज नेत्यांच्या बंडखोरीचा फटका अनेक पक्षांना बसण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटालाही माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.

माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देखील समोर येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Eknath Shinde
Maharashtra Politics: 2 कोटीच्या गाडीत फिरायचं आणि 17 रुपयांची साडी वाटायची; बच्चू कडूंचे नवणीत राणांवर टीकास्त्र

शुक्रवारी शेकडो समर्थकांसह संजय कोकाटे मुंबईत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांच्या विरोधात संजय कोकाटे यांनी शड्डू ठोकला आहे.

संजय कोकाटे हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्कप्रमुख म्हणून काम करत होते. महायुतीने भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर ते नाराज झाले होते. भाजप उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही असे त्यांनी यापूर्वी जाहीर केले होते. नाराज कोकाटे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची उत्सुकता होती.

अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी ते मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात जेष्ठ नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश करणार आहेत.

Eknath Shinde
Akola Lok Sabha: अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात काँग्रेसने केला उमेदवार जाहीर, अभय पाटील यांना दिलं तिकीट

कोकाटे हे अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. कोकाटे यांनी यापूर्वी बबन शिंदे यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती. कोकाटे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्याने माढ्यात महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com