Akola Lok Sabha: वंचितचा इशारा, निवडणूक आयोगाचे आदेश, अन् भाजपनं घेतली माघार; नेमकं काय आहे प्रकरण?

Akola News: अकोल्यात 3 तारखेला भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे नामांकन अर्ज भरणार आहेत. यासाठी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असून अकोला जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध भाजपने एक स्टेज उभारल्या जात होतं.
Akola Lok Sabha Constituency
Akola Lok Sabha ConstituencySaam Tv
Published On

>> अक्षय गवळी

Akola Lok Sabha Constituency:

अकोल्यात 3 तारखेला भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे नामांकन अर्ज भरणार आहेत. यासाठी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असून अकोला जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध भाजपने एक स्टेज उभारल्या जात होतं. जेणेकरून या स्टेजवर भाजपच्या नेत्यांना उभे राहता येईल. आता या स्टेजवरून वंचितनं निवडणूक आयोगालाच इशारा दिलाय.

भाजपाला स्टेज उभारू दिल्यास आम्हीही जिल्हाधिकारी कार्यालयावर सभा घेऊ, असा थेट इशारा वंचितनं निवडणूक आयोगाला दिला. त्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत स्टेज काढण्यासाठी आदेश दिले. यानंतर भाजपकडून थोड्या वेळातचं उभ केलं जाणार स्टेज काढण्यात आलंय. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Akola Lok Sabha Constituency
Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर? अयोध्या पोळ यांची पोस्ट चर्चेत

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्हाधिकारी कार्यालय रस्तावर रस्ता अडवून स्टेज उभारलं होतं. भाजप उमेदवाराच्या नामकांनसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि डझनभर भाजप नेत्यांसाठी हा रस्त्यावर स्टेज उभारला जात होता. आचारसंहिता केवळ इतर पक्षा साठी आहे का? अशी सवाल वंचितकडून प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी उपस्थित केला. तसेच सिव्हिजील' ॲपवर तक्रार दाखल केली. लागलीच निवडणूक विभागाने स्टेज काढून टाकण्याचे आदेश दिले.  (Latest Marathi News)

निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी 3 तारखेला भाजप उमेदवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि डझनभर महायुतींच्या नेत्यांसाठी थेट रस्त्यांवर स्टेज उभारला जात होतं. यापूर्वी कुठल्याही राजकीय पक्षासाठी थेट रस्त्यांवर स्टेज उभारण्याची परवानगी प्रशासनाने दिली नव्हती. सत्ताधारी भाजपसाठी नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले स्टेजबाबत वंचितन तक्रार दाखल केली. भाजपला जर स्टेज उभारू दिला तर 'आम्ही पहिली सभा जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन भवनात घेऊ आणि कुठलीही परवानगी घेणार नाही. असा इशारा देताच निवडणूक विभागाने तातडीने स्टेज काढून टाकण्याची कार्यवाही केली.

Akola Lok Sabha Constituency
Arvind Kejriwal: चौकशीदरम्यान केजरीवाल यांनी आपच्या कोणत्या 2 नेत्यांची घेतली नावे? कोर्टात ईडीने काय केला दावा?

दरम्यान, आम्ही स्टेज उभारलं होतं, पोलिसांनी विनंती केली, त्यानंतर आम्ही हे स्टेज काढलं आहे. वाहतुकीची कोणतीही कोंडी होणार नाही, याचा विचारही केला जाणार असल्याचं मत भाजपचे आमदार रणधीर सावरकरांनी व्यक्त केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com