Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर? अयोध्या पोळ यांची पोस्ट चर्चेत

Ayodhya Poul: कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करण्याच्या प्रयत्नात ठाकरे गट आहे.
Ayodhya Poul
Ayodhya PoulSaam Tv

>> अभिजित देशमुख

Kalyan Lok Sabha Constituency:

कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करण्याच्या प्रयत्नात ठाकरे गट आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, वरून सरदेसाई यांच्या पाठोपाठ केदार दिघे यांच्या नावाचे चर्चा होती. त्यात आज सकाळी अजून एक नावाची भर पडली.

ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पोळ यांनी ट्वीट करत एक पोस्ट शेअर केली . पोळ यांनी या पोस्टमध्ये मशाल चिन्हावर कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असून मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाविरोधात संधी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे आभार मानलेत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ayodhya Poul
Arvind Kejriwal: चौकशीदरम्यान केजरीवाल यांनी आपच्या कोणत्या 2 नेत्यांची घेतली नावे? कोर्टात ईडीने काय केला दावा?

पोळ यांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात अयोध्या पोळ यांच्या नावाची चर्चा होती. सकाळी अयोध्या पोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना फोन बंद होता. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले. सायंकाळी अयोध्या पोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही पोस्ट 'एप्रिल फूट' असल्याचे सांगितल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. (Latest Marathi News)

अयोध्या पोळ यांनी काय केलं होतं ट्वीट?

अयोध्या पोळ यांनी ट्वीट केलं होतं की, ''आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने मशाल चिन्हावर शिवसेनेकडून कल्याण लोकसभा लढवत आहे. ज्यांच्याकडे ईडी, आयटी सारखी ताकद आहे. असा स्वयंघोषित जागतिक स्तराचा सर्वात मोठा पेक्षासोबत युतीत आहे, अशा मुख्यमंत्र्याच्या खासदार मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.'' त्यांच्या या पोस्ट नंतर एकच चर्चांना उधाण आलं होतं.

Ayodhya Poul
Ayodhya PoulTwitter
Ayodhya Poul
Amit Shah: लोकशाहीवर बोलण्याचा राहुल गांधींना अधिकार नाहीच; इंदिरा गांधींचं नाव घेत अमित शाह यांचं जोरदार प्रत्युत्तर

याबाबत अयोध्या पोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठाकरेंनी खूप कार्यकर्ते मोठे केलेत. शिवसेनेत काहिही होऊ शकते. मात्र मी लहान कार्यकर्ता आहे, ही पोस्ट एप्रिल फुल होती, त्या म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com