Arvind Kejriwal: चौकशीदरम्यान केजरीवाल यांनी आपच्या कोणत्या 2 नेत्यांची घेतली नावे? कोर्टात ईडीने काय केला दावा?

ED News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत तुरुंगात पाठवण्यात आले आहे. रिमांड संपल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना न्यायालयात हजर केले होते.
Arvind Kejriwal, Atishi Marlena, Saurabh Bharadwaj
Arvind Kejriwal, Atishi Marlena, Saurabh Bharadwaj Saam Tv
Published On

Arvind Kejriwal News:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत तुरुंगात पाठवण्यात आले आहे. रिमांड संपल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना न्यायालयात हजर केले होते. यावेळी ईडीने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली. केजरीवाल यांना जामीन न मिळाल्यास त्यांना 14 दिवस तुरुंगात राहावे लागेल.

दरम्यान, कथित मद्य घोटाळ्यासंदर्भात पहिल्यांदाच केजरीवाल सरकारमधील मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांचीही नावे समोर आली आहेत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Arvind Kejriwal, Atishi Marlena, Saurabh Bharadwaj
Amit Shah: लोकशाहीवर बोलण्याचा राहुल गांधींना अधिकार नाहीच; इंदिरा गांधींचं नाव घेत अमित शाह यांचं जोरदार प्रत्युत्तर

केजरीवाल यांना विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ईडीच्या वतीने न्यायालयात हजर झालेल्या वकील एसव्ही राजू यांनी न्यायालयाला सांगितले की, सध्या त्यांच्या रिमांडची आवश्यकता नाही आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात यावे. एसव्ही राजू म्हणाले की, केजरीवाल बहुतेक प्रश्नांची अस्पष्ट उत्तरे देत आहेत आणि तपासात सहकार्य करत नाहीत. (Latest Marathi News)

यावेळी ईडीचे वकील एसव्ही राजू यांनी आतिशी यांचे नाव घेऊन मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, विजय नायर हे केजरीवाल यांच्या जवळचे आहेत. मात्र नायर हे आपल्याला रिपोर्ट करत नसल्याचे केजरीवाल यांनी चौकशीदरम्यान सांगितले. एसव्ही राजू यांच्या म्हणण्यानुसार, अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, नायर आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना रिपोर्ट करायचे. आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांची नावे या प्रकरणात पहिल्यांदाच समोर आली आहेत. सिसोदिया आणि सत्येंद्र जैन तुरुंगात गेल्यानंतर दोघेही केजरीवाल सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आहेत. या दोघांकडे बहुतांश मंत्रिपद सोपवण्यात आले आहे.

Arvind Kejriwal, Atishi Marlena, Saurabh Bharadwaj
Arvind Kejriwal: केजरीवाल यांचा आयफोन अनलॉक करण्यासाठी ईडीने मागितली ॲपलची मदत, जाणून घ्या कंपनी काय म्हणाली?

दरम्यान, आप नेते विजय नायर हे पक्ष आणि या घोटाळ्यात सामील असलेल्या साऊथ लॉबीमधील मध्यस्थ असल्याचा आरोप ईडीने केला आहे. ईडीने दावा केला होता की, केजरीवाल मद्य व्यावसायिक समीर महेंद्रू यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलले होते. त्यावेळी केजरीवाल यांनी विजय नायर हा त्यांचा माणूस असल्याचं सांगत त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास समीर महेंद्रू यांना सांगितले होते. कथित मद्य घोटाळ्यात अटक झालेले नायर हे पहिले आप नेते होते. या प्रकरणी केजरीवाल आणि नायर यांच्याशिवाय दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com