Arvind Kejriwal: केजरीवाल यांचा आयफोन अनलॉक करण्यासाठी ईडीने मागितली ॲपलची मदत, जाणून घ्या कंपनी काय म्हणाली?

ED News: एका मीडिया रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ईडीला अरविंद केजरीवाल यांचा फोन अनलॉक करण्यात अडचण येत आहे.
Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal NewsSaam Tv
Published On

Arvind Kejriwal iPhone:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गेल्या आठवडाभरापासून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कोठडीत असून त्यांना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. यातच एका मीडिया रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ईडीला अरविंद केजरीवाल यांचा फोन अनलॉक करण्यात अडचण येत आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अरविंद केजरीवाल यांनी आपला आयफोन बंद केला आणि त्याचा पासवर्ड कोणालाही सांगितलेला नाही. यानंतर ईडीने ॲपलशी संपर्क साधला आणि फोनमधील डेटा ॲक्सेस करण्यासाठी त्यांची मदत मागितली आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Arvind Kejriwal News
PM Modi in Mumbai : २०१४ आधी बँकिंग क्षेत्र डळमळीत होतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ॲपल आयफोन्स त्यांच्या हाय सेफ्टी फीचर्ससाठी ओळखला जातो. अँड्रॉइड स्मार्टफोनपेक्षा आयफोन अधिक सुरक्षित असल्याचे म्हटले जाते. तसेच आयफोन डेटा पासवर्डशिवाय ॲक्सेस करता येत नाही. म्हणून ईडीला हा फोन अनलॉक करण्यात अडचण येत आहे.  (Latest Marathi News)

कंपनीने ईडीला काय दिले उत्तर?

वृत्तानुसार, जेव्हा ईडीने ॲपलशी संपर्क साधला आणि अरविंद केजरीवाल यांचा फोन अनलॉक करण्यासाठी मदत मागितली तेव्हा कंपनीने सांगितले की डेटा ॲक्सेस करण्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे. ईडीला केजरीवाल यांचे चार फोन सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत.

Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal News: ब्रेकिंग! दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल १५ दिवस तुरुंगात

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. ईडीने केजरीवाल यांची 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. जी राऊस अव्हेन्यू कोर्टाने मंजूर केली आहे.

केजरीवाल यांच्याशिवाय दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, माजी मंत्री सत्येंद्र जैन आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांना कथित मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com