Akola Lok Sabha: अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात काँग्रेसने केला उमेदवार जाहीर, अभय पाटील यांना दिलं तिकीट

Akola Lok Sabha constituency: एक मोठी बातमी समोर येत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. अकोल्यात काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता अकोल्यात तिरंगी लढत होणार आहे.
Abhay Patil Vs Prakash Ambedkar
Abhay Patil Vs Prakash AmbedkarSaam Tv

>> अक्षय गवळी

Akola Lok Sabha constituency:

अकोला लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे आता अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कडून प्रकाश आंबेडकर आणि महायुतीकडून म्हणजेच भाजपकडून अनु धोत्रे. जे माजी केंद्रीय मंत्री तसेच विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र आहेत.

काँग्रेसचे अभय पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान कालच अकोल्यात महाविकास आघाडीत मविआ'च ठरलं होतंय. डॉ. अभय पाटिल हेचं अकोल्यात मविआ'चा उमेदवार असणार असं निश्चित झालं होतंय. दरम्यान येत्या 4 एप्रिल रोजी काँग्रेस नेते आणि इतर आघाडीतील पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अभय पाटील हे नामाकांन अर्ज दाखल करणार आहेत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Abhay Patil Vs Prakash Ambedkar
Ravi Rana: रवी राणा भाजपमध्ये करणार प्रवेश? चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं सूचक वक्तव्य

काल अभय पाटील यांच्या निवासस्थानावर मविआची बैठक पार पडली होती. या बैठकीला अकोल्यातले महाविकास आघाडीतले तिन्ही घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्यासह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर या बैठकीला प्रमुख म्हणून होते. तयारी लागा. 4 एप्रिल अर्ज दाखल करायचा, AB फॉर्म देणार, अशा वरिष्ट पातळीवरुन सुचना आल्या होत्या. त्यानुसार आज डॉक्टर अभय पाटील यांचे उमेदवारी काँग्रेसने निश्चित केलीय.  (Latest Marathi News)

दरम्यान, अकोल्यालोकसभेसाठी वंचितकडून प्रकाश आंबेडकर आणि महायुतीकडून अनूप धोत्रे हे निवडणूक लढ़वणार, असं चित्र स्पष्ट झालंय. आता काँग्रेसकडून अभय पाटील हे मैदानात उतरले आहेत. तोपर्यंत अकोल्यात कोण घोडामैदान मारून नेण्यासाठी स्वत:ला तयार करणार आहे? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Abhay Patil Vs Prakash Ambedkar
Akola Lok Sabha: वंचितचा इशारा, निवडणूक आयोगाचे आदेश, अन् भाजपनं घेतली माघार; नेमकं काय आहे प्रकरण?

डॉ. अभय पाटील यांचं प्रोफाइल

नाव : डॉ. अभय काशिनाथ पाटील

1) शिक्षण : (एम.बी.बी.एस. ऑर्थोपेडीक सर्जन) (M.B.B.S. Orthopedic Surgeon)

2) काँग्रेस पद : General Secretary Maharashtra Pradesh Congress Committee. President of Akola Hocky Committee.

3) जन्म तारीख : 20 जानेवारी 1965

व्यवसाय

गेल्या 30 वर्षापासून अकोल्यात अर्थोपेडीक सर्जन म्हणून प्रॅक्टिस करत आहे. विघ्नहर्ता क्रिटीकल केअर चे व्यवस्थापकीय संचालक, अकोला. आयकॉन हॉस्पिटलचे व्यवस्थापकी संचालक, अकोला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com