Ravi Rana: रवी राणा भाजपमध्ये करणार प्रवेश? चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं सूचक वक्तव्य

Chandrashekhar Bawankule: ''रवी राणा आज तरी युवा स्वाभिमान पक्षांमध्ये आहे, पण आमची त्यांना विनंती राहील त्यांनी कधीतरी विचार करावा की, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी यावं.'', असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
Chandrashekhar Bawankule On Ravi Rana
Chandrashekhar Bawankule On Ravi RanaSaam Tv

Chandrashekhar Bawankule On Ravi Rana:

''रवी राणा आज तरी युवा स्वाभिमान पक्षांमध्ये आहे, पण आमची त्यांना विनंती राहील त्यांनी कधीतरी विचार करावा की, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी यावं. पण शेवटी निर्णय त्यांना करायचा आहे'', असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

बावनकुळे म्हणाले, ''नवणीत राणा यांच्या उमेदवारीला एकनाथ शिंदे, अजित पवार, घटकपक्ष्यांच्या अकरा पक्षांच्या नेत्यांनी व घटक पक्षाच्या लोकांनी मान्यता दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या महायुतीने त्यांना तिकीट दिली आहे. त्यामुळे त्या अधिकृत उमेदवार आहे. मी सर्व घटक पक्षाच्या लोकांना विनंती करणार आहे की, त्यांनी नवनीत राणा यांना विजयी करण्यासाठी सहकार्य करावं.'' नवीन उमेदवार असला की थोडी नाराजी असते. प्रत्येकाला वाटते की आपल्याला उमेदवारी मिळावी, मात्र सर्वांचं समर्थन राणा यांना मिळेल, असंही ते म्हणाले.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chandrashekhar Bawankule On Ravi Rana
Akola Lok Sabha: वंचितचा इशारा, निवडणूक आयोगाचे आदेश, अन् भाजपनं घेतली माघार; नेमकं काय आहे प्रकरण?

ते म्हणाले की, ''भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्ता नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर नाराज नाही. कारण की भाजपाने मोदींच्या विकासाच्या गॅरंटीच्या संकल्पना साथ दिली आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समर्पित आहे. थोडीफार नाराज असली तरी भाजपाचा कार्यकर्ता पक्षविरोधात जात नाही.''  (Latest Marathi News)

महायुतीच्या जागावाटपावर बोलताना ते म्हणाले, ''लवकरच महायुतीचे उमेदवार जाहीर होणार आहेत. चार ते पाच जागेवर चर्चा सुरू आहे. दहा मिनिटाच्या बैठकीमध्ये सगळं संपवू शकते, एवढं क्लिअर आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांना विश्वासात घेऊन पुढे जात आहेत.''

बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, ''बच्चू कडू यांनी काय निर्णय घ्यायचा आहे, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांचा वेगळा पक्ष आहे, ते एकनाथ शिंदे यांच्या महायुतीमध्ये आहेत. त्यांचा आमच्यासोबत संबंध हा एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा आहे, त्यांचा तिढा एकनाथ शिंदे सोडवतील.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com