Haryana CM Oath Ceremony  Google
देश विदेश

Haryana CM Oath Ceremony : हरियाणाच्या नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली; PM मोदीही होणार सामील

Vishal Gangurde

हरियाणा : हरियाणाच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार, याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. नायब सिंह सैनी १७ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या रुपात शपथ घेणार आहेत. या शपधविधीच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सामील होणार आहेत. सैनी यांच्या शपथग्रहण सोहळ्याला भाजपची सत्ता असलेल्या राज्याचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, हरियाणात नायब सिंह सैनी हे मुख्यमंत्रिपदाची १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शपथ घेणार आहेत. हरियाणातील पंचकुलाच्या सेक्टर पाच येथील दसरा मैदानात शपथविधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी माहिती देताना म्हटलं की, 'आम्हाला पंतप्रधान मोदींची मंजुरी मिळाली आहे. नव्या सरकारचा शपधविधी सोहळा १७ ऑक्टोबर रोजी होईल. ९० विधानसभा मतदारसंघ असलेल्या हरियाणा राज्यात भाजपचे एकूण ४८ आमदार आहेत. या व्यतिरिक्त ३ अपक्ष आमदारांचाही पाठिंबा मिळाला आहे'.

हरियाणाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पंडित मोहन लाल बडौली यांनी अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा मिळाल्यानंतर म्हणाले की, 'मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वात ५१ आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर हरियाणात तिसऱ्यांदा भाजप सरकारची स्थापना होणार आहे. हरियाणातील जनतेने भाजपला बहुमत दिलं आहे. हरियाणात भाजपचे ४८ उमेदवार जिंकले आहेत. तर तीन अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

बडौली पुढे म्हणाले, 'स्वत:चा पराभव स्वीकारणे काँग्रेसची जुनी परंपरा आहे. हरियाणातील काँग्रेस पराभव हा पक्षातील गटबाजीमुळे झाल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसमधील लोक एकमेकांचं डोक फोडण्यात व्यग्र असतात. काँग्रेसमधील नेते फक्त समीक्षा करतात. मात्र, त्यांच्यामध्ये सुधारणा होत नाही. ते त्यांची सवय बदलू इच्छित नाहीत'.

बडौली पुढे म्हणाले, 'हिसारमध्येसावित्री जिंदल, बहादूरगडहून राजेश जून आणि गनौरमध्ये देवेंद्र कादियान यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. ५१ हा आकडा शुभ आहे. आम्ही ५१ आमदारांसोबत सरकारची स्थापना करत आहोत'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Breaking : हत्यांच्या घटनांनी अमरावती शहर हादरलं

Benefits of taking Steam: वाफ घेण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?

Maharashtra News Live Updates : महाविकास आघाडीचं मुंबईतील जागावाटप 90% पूर्ण, तीन जागांचा तिढा उद्यापर्यंत सोडवला जाणार

Maharashtra Assembly Election : निवडणूक जाहीर होताच महायुतीला सर्वात मोठा धक्का! राज्यात जुन्या मित्रपक्षाने सोडली साथ; VIDEO

Maharashtra Politics : विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीत मिठाचा खडा? अमित शहांच्या वक्तव्यानंतर शिंदे गट आक्रमक, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT