Haryana Elections Result: हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव का झाला? बैठकीत राहुल गांधींनी सांगितलं कारण

Haryana Elections Result: हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेसचा पराभव का झाला याचं कारण राहुल गांधी यांनी बैठकीत सांगितलंय.
Haryana Elections Result: हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव का झाला? बैठकीत राहुल गांधींनी सांगितलं कारण
Haryana Elections Result
Published On

हरियाणा निवडणुकीतील पराभवाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठे वक्तव्य केलंय. हरियाणा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला हे राहुल गांधींनी सांगितलं. दरम्यान हरियाणामध्ये झालेल्या पराभवावरुन महायुतीच्या नेत्यांकडून काँग्रेस आणि मविआवर टीका केली जात आहे.

हरियाणामध्ये भाजपचा विजय व्हीव्हीपीएटीत झालेल्या गडबडीमुळे झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आह. याचदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पराभवाची कारणं सांगितली आहेत.

हरियाणा निवडणुकीच्या निकालानंतर, काँग्रेसने आज (१०ऑक्टोबर) एक आढावा बैठक घेतली, यात त्यांनी पराभवाचं कारण सांगितले. हरियाणात पराभव झाला कारण निवडणुकीत नेत्यांनी पक्षापेक्षा आपल्या हितसंबंधांना प्राधान्य दिलं.

Haryana Elections Result: हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव का झाला? बैठकीत राहुल गांधींनी सांगितलं कारण
Sanjay Shirsat: महाविकास आघाडी टिकणार नाही; हरियाणाच्या निकालावरून शिरसाट यांचं मविआवर शरसंधान

काँग्रेसने घेतलेल्या आजच्या बैठकीत भूपेंद्र सिंह हु्ड्डा आणि पीसीसी अध्यक्ष सूरजभान यांना बोलवण्यात आले होते. परंतु हे दोन्ही नेते बैठकीला आले नाहीत. यानंतर अजय माकन यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. या बैठकीत फक्त वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहतील. त्यात हरियाणामधील नेत्यांनाही या बैठकीत बोलवण्यात येईल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक फॅक्ट चेक कमिटी स्थापन केली जाईल.

पराभवाच्या कारणांवर चर्चा

अजय माकन यांनी सांगितलं की,बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे , राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, अशोक गहलोत, आणि आयसीसी सचिव दीपक बावरिया तसेच इतर ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित होते. प्रत्येकाने हरियाणा निवडणुकीचा सविस्तर आढावा घेतला. सर्व वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल आले. परिणाम अनपेक्षित होते, असे माकन म्हणाले.

अशा निकालांची कोणालाच अपेक्षा नव्हती. एक्झिट पोल आणि निकाल यात मोठी तफावत होती. वेगवेगळ्या कारणांवर चर्चा झाली. या आढावा बैठकीनंतर सविस्तर चर्चा होऊन कार्यवाही केली जाणार असल्याचं अजय माकन यांनी सांगितले.

गटबाजी झाली

या आढावा बैठकीत कुमारी सेलजा आणि राज्यसभा खासदार रणदीप सुरजेवाला यांना बोलवण्यात आले नव्हते. परंतु या बैठकीत लालू प्रसाद यादव यांचे व्याही आणि काँग्रेस नेते कॅप्टन अजय यादव यांना बोलवण्यात आले होते. दरम्यान निवडणुकीच्या दरम्यान हुडा ग्रुप आणि सेलजा ग्रुपमधील वाद चव्हाट्यावर आल्याच्या अनेक बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. हे दोन्ही नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत स्वतःला पुढे करण्यात व्यस्त होते. दोन्ही गटातील वादाच्या बातम्या माध्यमांमध्ये आधीच आल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com