Minister Car Accident  Saam Tv
देश विदेश

Accident: मंत्र्यांच्या कारला महामार्गावर भीषण अपघात, वाहनाचा चुराडा; जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

Minister Krishan Lal Panwar Car Accident: हरियाणाचे मंत्री कृष्णलाल पानवार यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Priya More

Summary -

  • हरियाणाचे मंत्री कृष्णलाल पनवार यांच्या कारला अपघात

  • पानिपतजवळ त्यांच्या ताफ्यातील वाहनं एकमेकांवर धडकली

  • या अपघातामध्ये मंत्र्यांच्या कारच्या पुढील भागाचा चुराडा झाला

  • अपघातामध्ये जखमी झालेल्या मंत्र्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

हरियाणाचे मंत्री कृष्णलाल पनवार यांच्या कारला भीषण अपघात झाला. शुक्रवारी पानिपतमधील जीडी रोडवर त्यांच्या ताफ्यामधील वाहनं एकमेकांवर धडकली. या अपघातामध्ये मंत्र्यांच्या कारचा चुराडा झाला. या अपघातामध्ये मंत्री गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या टीमकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कृष्णलाल पनवार कर्नालहून प्रवास करत होते. पानिपतजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. चंदीगडवरून परत येत असताना एल्डिको सिटीजवळ अचानक ब्रेक लावल्यामुळे त्यांच्या ताफ्यातील वाहनांची टक्कर झाली. या अपघातामध्ये मंत्र्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. त्यांना कारमधून बाहेर काढून तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मंत्री कृष्णलाल पनवार यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

मंत्री जखमी झाल्याची माहिती मिळताच अनेक आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. मंत्र्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाने अचानक इमर्जन्सी ब्रेक लावला. त्यामुळे त्यांच्या ताफ्यातील पुढच्या वाहनांनीही तात्काळ ब्रेक लावले ज्यामुळे मंत्र्यांच्या वाहनासह तीन ते चार वाहने एकमेकांवर जोरात आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, मंत्र्यांच्या वाहनाच्या पुढचा भागाचा चक्काचूर झाला. अपघातामध्ये मंत्री जखमी झाले.

या अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण होते. रुग्णालयात मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक जमले होते. अपघाताची माहिती मिळताच पानिपत अर्बनचे आमदार प्रमोद विज, डीसी वीरेंद्र दहिया आणि पोलीस अधीक्षक भूपेंद्र सिंह तात्काळ सरकारी रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांचे पथक मंत्र्यांच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सुदैवाने या अपघातामध्ये मंत्र्यांनी गंभीर दुखापत झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉकची घोषणा; रविवारी प्रवाशांचे मेगा हाल होणार, कसं असेल वेळापत्रक?

पदे बोगस, पदव्याही बोगस! मुंबईच्या कॉलेजचा मोठा घोटाळा उघड; १३२ विद्यार्थ्यांची फसवणूक

Maharashtra News Live Update: लातूरच्या उदगीर शहरासह तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

Heart blockage: शरीरात ही ६ सायलेंट लक्षणं दिसली तर समजा हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यात

दर महिन्याला PF कापला जातोय? निवृत्त झाल्यानंतर किती फंड मिळणार? EPF आणि EPS चे गणित समजून घ्या

SCROLL FOR NEXT