Haryana CM Nayab Singh Saini announces Hansi as the state’s 23rd district. saam tv
देश विदेश

New District: राज्यात नव्या जिल्ह्याची निर्मिती; हरियाणा सरकारचा मोठा निर्णय

Haryana District Reorganisation: हरियाणा राज्यातील एका नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलीय. त्यामुळे राज्यात आता २२ नव्हे तर २३ जिल्हे असतील. नव्या जिल्ह्याबाबत मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी हंसी विकास रॅली दरम्यान घोषणा केली.

Bharat Jadhav

  • हरियाणा राज्यात नव्या जिल्ह्याची निर्मिती

  • मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी विकास रॅलीत केली घोषणा.

  • हांसी हा हरियाणाचा २३ वा जिल्हा ठरणार.

हरियाणा राज्यात आता २३ जिल्हे असणार आहेत. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी हांसीमध्ये २३ व्या जिल्ह्याची घोषणा केली. एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताना सांगितले की, "आज मी हांसीला हरियाणाचा २३ वा जिल्हा म्हणून घोषित करतो."मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर, हांसी जिल्हा म्हणून स्थापन करण्यासाठी लवकरच अधिसूचना जारी केली जाणार आहे. नवीन जिल्ह्याच्या निर्मितीनंतर हिसार जिल्ह्यात हिसार आणि बारवाला हे दोन तहसील असतील, तर हांसी जिल्ह्यात हांसी आणि नारनौंड तहसील असणार आहे.

मुख्यमंत्री सैनी यांनी हांसी विकास रॅलीमध्ये ही घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "आज मी घोषणा करतो की हांसी हा हरियाणाचा २३ वा जिल्हा बनेल." मुख्यमंत्र्याची घोषणेचा नागरिकांना स्वागत केलं.

हांसीला जिल्हा घोषित करण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत होती. जनेतेची मागणी मान्य करत नव्या जिल्ह्याची घोषणा करण्यात आली. २०१६ मध्ये हरियाणा सरकारने हिसार जिल्ह्यातून नवीन हांसी जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर १९ एप्रिल २०१७ रोजी हांसी पोलीस अधीक्षक कार्यालय स्थापित करण्यात आले.

हांसी येथे आधीच पोलीस अधीक्षक कार्यालय आहे. आता जिल्ह्याच्या घोषणेसह येथे जिल्हा मुख्यालय आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे कार्यालय देखील असणार आहे. भिवानी जिल्ह्याचा भाग असलेल्या बावनी खेरा येथील काही गावे देखील हांसीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत. ही गावे बिवानी जिल्हा मुख्यालयापासून ३०-४० किलोमीटर अंतरावर आहेत, तर काही गावे त्याहून दूर आहेत.

तर हांसी जिल्हा झाल्यानंतर या ग्रामीण भागांचे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयापासूनचे अंतर फक्त १५-१७ किलोमीटर असेन.हांसी पोलिसांच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, हांसी हा हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यातील एक नगरपरिषद आणि विधानसभा मतदारसंघ आहे. हे हिसारपासून २६ किलोमीटर दूर अंतरावर आहे. हांसीमध्ये पुरातत्वीय महत्त्वाच्या अनेक महत्त्वाच्या इमारती आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT