मुख्यमंत्री नितीश कुमार वादात; नियुक्ती पत्र घ्यायला आलेल्या महिलेचा हिजाब खेचला, RJD कडून व्हिडिओ व्हायरल

Nitish kumar viral video : मुख्यमंत्री नितीश कुमार वादात सापडलेत. नितीश कुमार यांनी नियुक्ती पत्र घ्यायला आलेल्या महिलेचा हिजाब खेचल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
nitish kumar
nitish kumar news Saam tv
Published On
Summary

मुख्यमंत्री नितीश कुमार वादात

नितीश कुमार यांनी भर कार्यक्रमात महिलेचा हिजाब ओढला

आरजेडीकडून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा व्हिडिओ व्हायरल

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार वादात सापडले आहेत. भर कार्यक्रमात एका महिलेचा हिजाब ओढल्याने नितीश कुमार टीकेचे धनी ठरले आहेत. या प्रकारानंतर राष्ट्रीय जनता दलाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा व्हिडिओ शेअर करत निशाणा साधला. आरजेडीने थेट मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमार यांचा वादग्रस्त व्हिडिओ शेअर करत महिलेचा हिजाब हटवल्याचा आरोप केला. राष्ट्रीय जनता दलाने म्हटलं की, 'नितीश कुमार यांना नेमकं काय झालंय? त्यांची मानसिक स्थितीची अवस्था दयनीय झाली आहे. नितीश कुमार आता १०० टक्के संघाच्या विचाराचे झाले आहेत'.

काँग्रेसने निशाणा साधत म्हटलं की, 'हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत. त्यांचं लाजीरवाणं कृत्य पाहा. डॉक्टर महिला स्वत:चं नियुक्ती पत्र घ्यायला गेली, त्यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तिचा हिजाब ओढला. ते बिहारच्या सर्वोच्च पदावर बसले आहेत. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी चुकीचं कृत्य केलंय. आता विचार करा, बिहार राज्यातील महिला किती सुरक्षित असतील, नितीश कुमार यांना आता राजीनामा द्यायला हवा. ते माफ करण्याच्या पात्रतेचेही नाहीत'.

बिहार काँग्रेसने म्हटलं की, 'एका डॉक्टर महिलेला नियुक्ती पत्र देताना तिचं हिजाब ओढणे ही निंदनीय आणि लाजीरवाणी बाब आहे. राज्याचे प्रमुख असं कृत्य करत असेल, तर तो व्यक्ती महिलांच्या सुरक्षेबाबत कशी काय हमी देऊ शकतो? खरंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायला हवा'.

तत्पूर्वी , मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर चहूबाजूने टीका होत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर अद्याप मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. या वादावर मुख्यमंत्री नितीश कुमार काय प्रतिक्रिया देणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com