Ajit Pawar plane crash, Rohit Pawar video claim : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानातील स्फोट आणि ब्लॅक बॉक्स बॉस जळलेल्यावर त्यांनी थेट पुरावाच दिला. विमानात अतिरिक्त फ्युल टँक होते, असा त्यांनी म्हटलेय. रोहित पवार यांनी त्याबाबतचा व्हिडिओ दाखवत सवाल उपस्थित केले आहेत. विमानातील इंधन आणि ब्लॅक बॉक्सच्या स्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
रोहित पवार यांनी एक व्हिडिओ दाखवला. ते नेमकं काय म्हणाले ?
विमानाचा एकच स्फोट झाला नाही, असे बरेच स्फोट झाले होते. २०२३ चं विमान जे पडलं होतं ते मोठं होतं आणि ते पडत असताना रनवेवर पडलं होतं. रनवेवर पडलं म्हणजे रनवेची जी सरफेस (पृष्ठभाग) आहे ती डांबरी होती नाहीतर कडक होती. दादांचे विमान जे पडलं होतं तसं कडक सरफेसवर म्हणजे ते रनवेवर पडलं नव्हतं, ते साईडला पडलं होतं.
उदाहारण म्हणून पाहा... बॉल तुम्ही फरशीवर टाकला तर बाऊन्स जास्त होतो आणि तो मातीत टाकला तर कमी होतो. त्यामुळे तो जो इम्पॅक्ट आहे, ॲज कम्पॅरेटिव्हली त्याची व्हेलोसिटी आणि सगळ्या गोष्टी बघितल्या तर जिथं दादांचं विमान पडलं तिथं ते कमी व्हायला पाहिजे होतं. पण स्फोट का झाला? त्याचं मुख्य कारण विमानामध्ये अधिकचे फ्यूल टँक होते का?
फ्यूल टँक कुठं असतं? जिथं टॉयलेट असतं, म्हणजे जो विमानाचा शेवटचा भाग असतो तिथं ते ठेवण्याची जागा असते आणि त्याच्या मागच्याच बाजूला तिथं ब्लॅक बॉक्स असतो. म्हणजे हे जे म्हणतात की जळलं नाहीतर तिथपर्यंत आग गेली होती, तर त्याच्या पुढच्याच बाजूला म्हणजे पहिले कॅन पेटले आणि नंतर विमानाचे पंखातलं पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणता येईल.
आता हे सगळे डिटेल्स आहेत... पेट्रोल किती लागणार आहे, २५० लिटर की ४०० लिटर, याचा ॲव्हरेज आम्ही काढलेला आहे. हे सगळे गणित त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मुंबईवरून हे विमान जात असताना फुल टँक हे भरले होते. म्हणजे ते पूर्ण विमानाचे जे पंखे असतात, त्या पंख्यामध्ये जो टँक असतो तो फुल भरला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.