अल्पसंख्याक शाळांच्या प्रमाणपत्राचा घोटाळा; रोहित पवारांनी जारी केलं घोटाळ्याचं रेटकार्ड

Maharashtra Minority School Certificate Scam: राज्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या अल्पसंख्याक शाळांच्या प्रमाणपत्र घोटाळ्यात नवा ट्विस्ट आलाय.. या घोटाळ्याचं रेटकार्डच आमदार रोहित पवारांनी जारी केलंय.. मात्र या घोटाळ्यात कोणत्या अधिकाऱ्यांवर आरोप केले जात आहेत.पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Maharashtra Minority School Certificate Scam:
MLA Rohit Pawar while announcing the 'rate card' regarding the certificate scam of minority schools.saam tv
Published On
Summary
  • अल्पसंख्याक शाळांच्या प्रमाणपत्र प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप

  • रोहित पवार यांनी कथित ‘रेटकार्ड’ जाहीर केले

  • शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूमुळे राज्यतील जनता हळहळत होती. त्याच वेळी मंत्रालयात अल्पसंख्याक शाळांच्या घोटाळ्याच्या फाईल फिरत होती. होय.राज्यात अल्पसंख्याक शाळांच्या प्रमाणपत्राचा मोठा घोटाळा समोर आलाय. याच महाघोटाळ्याचं रेटकार्ड जारी करत रोहित पवारांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत.

Maharashtra Minority School Certificate Scam:
Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

दुसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. तर या प्रकरणाची सखोल चौकशी आदेश दिलेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 75 अल्पसंख्याक शाळांना देण्यात आलेलं प्रमाणपत्राला स्थगिती देत दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिलेत.

Maharashtra Minority School Certificate Scam:
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताचा संशय; सुनेत्रा पवारांकडून CBI चौकशीची मागणी

खरंतर 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या आठवड्यात राज्यात तब्बल 75 शाळांना अल्पसंख्याक प्रमाणपत्रं देण्यात आले.. आणि याच प्रकरणी अक्षय जैन यांनी अल्पसंख्याक शाळांना देण्यात येत असलेल्या प्रमाणपत्राच्या घोटाळ्यावर बोट ठेवत थेट उपसचिव मिलिंद शेनॉय यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

दुसरीकडे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी तर राज्यातील 95 टक्के अल्पसंख्याक शाळा बोगस असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे फक्त 75 अल्पसंख्याक शाळांना दिलेल्या प्रमाणपत्राला स्थगिती देण्याऐवजी बोगस अल्पसंख्याक शाळांचा पर्दाफाश करण्यासाठी या घोटाळ्याच्या मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. एवढंच नाही तर अल्पसंख्याक प्रमाणपत्राच्या घोटाळा आता चव्हाट्यावर आलाच आहे तर या निमित्ताने सर्वच शाळांच्या प्रमाणपत्रांची चौकशी करुन बोगसगिरीचा बुरखाही फाडायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com