Haryana Election Result Saam Digital
देश विदेश

Haryana Election Result : विनेश फोगाट, हुड्डा, चौटाला, अनिल वीज; हरियाणात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? वाचा सविस्तर

Haryana Election Result Update : हहियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे. सुरुवातीला आघाडीवर असलेली काँग्रेस पिछाडीवर आहे.

Sandeep Gawade

हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आतापर्यंत भाजपने अनेक जागांवर मुसंडीमारली आहे. सुरुवातील आघाडीवर असलेल्या काँग्रेसची घसरगुंडी झाली आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, जेजेपीचे अध्यक्ष अभय सिंह चौटाला, विनेश फोगाट, भाजपचे अनिल विज यांच्या सध्या काट्याची टक्कर सुरू असून अवघ्या काही मताचं अंतर पहायला मिळत आहे.

भूपेंद्र सिंह हुड्डा आघाडीवर

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भूपेंद्र सिंह हुड्डा गढी सांपला-किलोई विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरले होते. राज्यातील अटीतटीच्या लढतींमध्ये या सीटचा समावेश आहे. या मतदारसंघातून भूपेंद्र सिंह हुड्डा आघाडीवर आहेत. भूपेंद्र सिंह हुड्डा 14995 मतांसह आघाडीवर आहेत, तर भाजपच्या मंजू 3896 मतांसह त्यांच्याशी स्पर्धा करत आहेत. आम आदमी पक्षाचे उमेदवार परवीन खूप मागे आहेत.

या मतदारसंघातून भूपेंद्र सिंह हुड्डा सलग चार निवडणुका जिंकले आहेत. 2005 साली भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतली होती. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा 2009 मध्येही तेच मुख्यमंत्री झाले. आता जर काँग्रेसचे 10 वर्षांचे सत्ता नसण्याचे दुष्काळ संपले, तर भूपेंद्र सिंह हुड्डा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची तयारी करू शकतात.

विनेश फोगाट पिछाडीवर

पहलवानीतून निवृत्त होऊन राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या विनेश फोगाट हरियाणातील काँग्रेस पक्षाचा प्रमुख चेहरा बनल्या आहेत. विनेश फोगाट यांना पक्षाने जींद जिल्ह्यातील जुलाना मतदारसंघातून तिकीट दिले. विनेश फोगाट यांचा राजकीय करिअर फार जुना नाही, मात्र सध्या त्या पिछाडीवर आहेत. विनेश फोगाट आणि भाजपचे योगेश कुमार यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे.

अभय सिंह चौटाला पिछाडीवर

इंडियन नॅशनल लोकदल पक्षाचे नेते अभय सिंह चौटाला यांनी ऐलनाबादमधून निवडणूक लढवली होती. हरियाणातील ही महत्त्वाची सीट मानली जाते. या विधानसभा मतदारसंघात चौटाला कुटुंबाची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली आहे. अभय सिंह चौटाला आणि काँग्रेसचे भरत सिंह बेनीवाल यांच्यात सध्या चुरस सुरू आहे. काँग्रेसचे भरत सिंह बेनीवाल 15323 मतांसह आघाडीवर आहेत, तर अभय सिंह चौटाला 10385 मतांसह पिछाडीवर आहेत.

दुष्यंत चौटाला आघाडीवर

जननायक जनता पार्टीचे प्रमुख दुष्यंत चौटाला यांची उचाना कला जागेवर देखील कडवी लढत पाहायला मिळत आहे. गेल्या निवडणुकीत जेजेपी किंगमेकर ठरली होती. 2019 मध्ये भाजपसोबत सरकार बनवलं आणि उपमुख्यमंत्री झाले होते. 2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या प्रेम लता यांचा 47,452 मतांनी पराभव केला होता. मात्र, यावेळी दुष्यंत चौटाला पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात आयएनएलडीचे बृजेंद्र सिंह 14392 मतांसह आघाडीवर आहेत.

अनिल विज पिछाडीवर

अनिल विज हे भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते मानले जातात. अनिल विज यांनी हरियाणातील अंबाला कँट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. अंबाला कँट मतदारसंघावर भाजपची मजबूत पकड आहे. हा मतदारसंघ विज यांचा बालेकिल्ला मानला जातो. अनिल विज या मतदारसंघातून पाच वेळा आमदार बनले आहेत, परंतु यावेळी कदाचित जनतेने बदलाचा निर्णय घेतला आहे. अनिल विज या मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार चित्रा सरवारा 3894 मतांसह आघाडीवर आहेत, तर अनिल विज 2951 मतांसह पिछाडीवर आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT