हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी शनिवारी मतदान झालं. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, भूपेंद्र सिंह हुड्डा, काँग्रेसच्या विनेश फोगट आणि जेजेपीच्या दुष्यंत चौटाला यांच्यासह 1027 उमेदवारांचे नशीब ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. मतमोजणी 8 ऑक्टोबर रोजी होईल. मात्र, त्याआधी निवडणुकीच्या Exit Poll चे निकाल जाहीर झाले आहेत. यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर भाजपला केवळ २७ जांगा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ध्रुव रिसर्च Exit Poll
ध्रुव रिसर्चच्या सर्वेक्षणात, हरियाणामध्ये काँग्रेस बहुमतात सरकार स्थापन करू शकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हरियाणाच्या 90 विधानसभा जागांपैकी सुमारे 57 जागा काँग्रेसला मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला केवळ २७ जागा मिळण्याची शक्यता आहे.
दैनिक भास्करच्या एक्झिटपोलमध्ये भाजपला १५-२९ तर काँग्रेसला तब्बल ४४-५४ जागा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर आपला १ आणि जेजेपी १ तर लोक दल पक्षाला १-५ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
पिपल्स पल्सच्या Exit Poll मध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असून ४९-६१ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहेत. भाजपला २० ते ३२ जागांवर समाधान मानावं लागेल असं Exit Poll मधून समोर येत आहे.
रिपब्लिक भारत मॅट्रीझच्या सर्वेक्षणात भाजप १८-२१ जागांवर गडगडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेस ५५ ते ६२ जागा जिंकून सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. जेजेपीला ३ तर लोक दल पक्षाला ३ ते ६ जागा आणि अपक्ष २-५ जागा जिंकण्याची शक्यता आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४० जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला ३१ जागां मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपने जननायक जनता पक्षासोबत युतीचं सरकार स्थापन केलं. होतं. मात्र यावेळी काँग्रेस निवडणुकीत सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती. निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. निवडणुकीचा निकाल येत्या ३ दिवसात जाहीर होणार आहे. मात्र त्या आधी आलेल्या एक्झिट पोलच्या सर्वेक्षणांमध्ये भाजप पिछाडीवर जाताना दिसत आहे. तर काँग्रेस १० वर्षांनंतर सत्तेत येण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.