Haryana Crime News  Saam Tv
देश विदेश

Crime: मुलीला शेतात खेचत नेलं, तिघांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Haryana Crime News: हरियाणामध्ये भयंकर घटना घडली. १७ वर्षीय मुलीला शेतामध्ये खेचत नेऊन तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर तिन्ही आरोपींनी पीडितेला अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

Priya More

Summary:

  • हरियाणामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली

  • शेतामध्ये खेचून नेत रात्रभर या मुलीवर आरोपींनी बलात्कार केला

  • तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

  • फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत

हरियाणामध्ये १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ३ तरुणांनी शेतात नेऊन अल्पवयीन मुलीसोबत हे भयंकर कृत्य केले. त्यानंतर मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट करून व्हायरल करण्याची धमकी दिली. सोमवारी रात्री हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली.

आरोपींनी अल्पवयीन मुलीला शेतामध्ये खेचून नेलं आणि रात्रभर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी दोन पथकं तयार केली आहेत.

पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, आरोपींनी काही महिन्यांपूर्वी पीडित मुलीला मारहाण केली होती आणि तिचा व्हिडीओ तयार करून तिला ते ब्लॅकमेल करत होते. आरोपींनी मुलीला एक मोबाइल दिला होता. या मोबाइलद्वारे सतत संपर्कात राहावे यासाठी ते तिच्यावर दबाव टाकत होते. त्यांनी तिला धमकी दिली होती की जर तिने संपर्क तोडण्याचा प्रयत्न केला तर ते तिचे जुने आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करतील.

शुक्रवारी रात्री आरोपींनी पीडित मुलीला धमकी देत तिला घरातून बाहेर पडण्यास भाग पाडले. त्यानंतर ते तिला घेऊन एका शेतात गेले आणि तिला ओलिस ठेवत तिच्यावर रात्रभर आळीपाळीने बलात्कार केल. शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आरोपींनी मुलीला सोडून दिलं. पण जाताजाता पुन्हा तिचे अपहरण केले आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी घटनेचा व्हिडीओ शूट करून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती आणि ती मानसिक तणावात होती. या घटनेनंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेत शनिवारी ३ तरुणांविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा तपास सुरू केला. आरोपी पीडित मुलीच्या ओळखीतील होते आणि ते गेल्या अनेक महिन्यांपासून तिला संपर्कात राहावे यासाठी धमकावत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी

Wednesday Horoscope: लक्ष्मी उपासना चांगलं फळ देईल, या राशीची पैशाची समस्या वाढेल, वाचा बुधवारचे राशीभविष्य

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली

Haunted Historical Places : पर्यटक 'या' किल्ल्याला भेट देण्यास घाबरतात, इतिहासात लपलंय गूढ

Wedding Fashion Tips: लग्नाना जाताना साडीच कशाला, लेहेंग्याच्या 'या' डिझाईन्स ट्राय करा, दिसाल सगळ्यात हटके

SCROLL FOR NEXT