Crime: मंदिरात दर्शनासाठी गेले असता भयंकर घडलं, पुजाऱ्याकडून १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Madhya Pradesh Crime: मंदिरामध्ये दर्शनसाठी गेले असता एका १७ वर्षीय मुलीची पुजाऱ्यासोबत ओळख झाली. दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. त्यानंतर पुजाऱ्याने तिला भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार केला.
Crime: मंदिरात दर्शनासाठी गेले असता भयंकर घडलं, पुजाऱ्याकडून १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
Madhya Pradesh CrimeSaam Tv
Published On

Summary:

  • पुजाऱ्याने १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केला

  • मध्य प्रदेशच्या शाजापूरमध्ये ही घटना घडली

  • घरी नेऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला

  • आरोपी पुजाऱ्याला पोलिसांनी अटक केली

मध्य प्रदेशमध्ये १२ वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. ही विद्यार्थिनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेली होती. त्यावेळी पुजाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना मध्य प्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यातील अकोदिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडितेने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या आहेत.

१२ वीमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी दररोज मंदिरात दर्शनासाठी जाते. नेहमी मंदिरात जात असल्यामुळे तिची मंदिरातील पुजारी कुश शर्माशी ओळख आणि मैत्री झाली. त्यानंतर दोघे फोनवर बोलू लागले. पुजारी अधूनमधून विद्यार्थिनीच्या आईला फोन करत असे. त्यांची मैत्री वाढत असताना पुजारी तिला प्रेमसंबंधात अडकवतो. लग्नाचे आमिष दाखवून तो तिला भेटण्यासाठी बोलावतो आणि तिच्यावर बलात्कार करतो. मंदिराच्या आवारात असलेल्या खोलीमध्ये त्याने तिच्यावर बलात्कार केला.

Crime: मंदिरात दर्शनासाठी गेले असता भयंकर घडलं, पुजाऱ्याकडून १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
Shocking: भयंकर! सोशल मीडियावर फक्त १०० रुपयांत विकले जातात कपल्सचे प्रायव्हेट व्हिडीओ

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, १८ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता पुजारी कुश शर्माने तिला मेसेज करून घराबाहेर भेटण्यासाठी बोलावले. २ वाजता घरातील सर्वजण झोपलेले असताना ती कुणालाही काही न सांगता घराबाहेर पडली. त्यावेळी कुश शर्मा तिच्या घराबाहेर रस्त्यावर उभा होता. तो तिला त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि तिथे त्याने जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास तुझा जीव घेईल अशी धमकी पुजाऱ्याने दिली.

Crime: मंदिरात दर्शनासाठी गेले असता भयंकर घडलं, पुजाऱ्याकडून १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
Shocking: धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं, नवी मुंबई हादरली; थरकाप उडवणारा VIDEO समोर

या घटनेनंतर घाबरलेली विद्यार्थिनी घरी परतली. तिने धाडस करून तिच्या आई आणि भावाला पुजाऱ्याने बलात्कार केल्याचे सांगितले. हे ऐकून तिच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या कुटुंबीयांनी तिला घेऊन अकोडिया पोलिस ठाण्यात धाव घेत पुजाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पुजाऱ्याला अटक केली. आरोपी अकोडिया रेल्वे स्थानकासमोरील हनुमान मंदिरात पुजारी आहे. तो त्याच्या कुटुंबीयांसोबत मंदिराच्या आवारातच राहतो.

Crime: मंदिरात दर्शनासाठी गेले असता भयंकर घडलं, पुजाऱ्याकडून १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
Shocking: पबबाहेर अंदाधुंद गोळीबार, धडाधड गोळ्या झाडल्या; ३ मुलांसह ११ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com