Haryana CM Oath Ceremony 
देश विदेश

Haryana CM Oath Ceremony: नायब सिंह सैनी दुसऱ्यांदा बनले मुख्यमंत्री, जाणून घ्या संपूर्ण मंत्रिमंडळ

Haryana CM Oath Ceremony: नायब सिंह सैनी यांनी सलग दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्यावेळी पीएम मोदी, जेपी नड्डा, अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

Bharat Jadhav

भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते नायब सिंग सैनी यांनी दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यादरम्यान व्यासपीठावर पीएम मोदी,अमित शहा,जेपी नड्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, सीएम योगी आणि भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. याशिवाय एनडीएकडून लालन सिंह, पवन कल्याण, चंदबाबू नायडू, चिराग पासवान हेही उपस्थित होते.

सीएम सैनी यांच्यानंतर भाजप आमदार अनिल विज यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. ते राज्यातील भाजपच्या ज्येष्ठ आमदारांपैकी एक आहेत. अनिल विज सातव्यांदा अंबाला कँटमधून आमदार झालेत. ते 70 च्या दशकात संघात सामील झाले आणि ते पंजाबी समजाचे प्रतिनिधीत्व करतात.

अनिल विज यांच्यानंतर किशन लाल पवारने मंत्री पदाची शपथ घेतली. ते इसराना विधानसभा जागेवरून सहाव्यांदा आमदार बनलेत. खट्टर सरकार असतांना म्हणजेच २०१५ ते २०१९ पर्यंत अनेक खात्याचं मंत्रीपद भुषवलंय.

जाट समाजाचे महिपाल धांडा कॅबिनेट मंत्री

त्यानंतर चौथ्या नंबरवर राव नरबीर सिंह यांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतली. ते चारवेळा आमदार राहिलेत आणि खट्टर सरकारमध्ये मंत्रीही राहिलेत. पाचव्या क्रमांकावर जाट समाजातील महिपाल धांडा यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. महिपाल धांडाहून ते सलग तिसऱ्यांदा पानीपत ग्रामीण जागेवरून आमदार झालेत.

श्यामसिंह राणाही झाले मंत्री

फरिदाबादच्या जागेवरून विपुल गोयल यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. वैश्य जमातीचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या गोयल यांनी दुसऱ्यांदा आमदार झालेत. खट्टर सरकारच्या काळात ते मंत्री राहिलेत. सातव्या नंबरवर अरविंद शर्मा यांनी शपथ घेतली. सोनीपतच्या गोहाना जागेवरून ते आमदार झालेत. २०१४मध्ये ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते. त्यांना चारवेळा आमदारकीय भुषावलीय.

तर राजपूत समाजचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या श्याम सिंह राणा यांनी शपथ घेतली. २०१४ मध्ये ते भाजपचे आमदार झालेत. २०२० मध्ये शेतकरी विधेयकाच्या निषेधार्थ त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. याआधी ते INLD मध्ये होते.

किशनलाल यांच्यानंतर कृष्णलाल मंत्रिमंडळातील दुसरा दलित चेहरा आहेत रणबीर गंगवा. गंगवा हे नरवाला मतदारसंघाचे आमदार आहेत. ते विधानसभेचे उपसभापतीही राहिले आहेत. २०१४ मध्ये ते पहिल्यांदा नलवा मतदारसंघातून आमदार झाले. मागासलेला चेहरा म्हणून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय. कृष्णकुमार बेदी यांचा दलित चेहरा म्हणून भाजपमध्ये समावेश करण्यात आला आहे. २०१४ मध्ये ते पहिल्यांदा राज्यमंत्री झालेत.

मंत्रिमंडळात अनेक महिला चेहरे असून यातील आरती राव आणि श्रुती चौधरी यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हे दोघे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेत. श्रुती चौधरी या ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बनशीलाल यांची नात आहे. श्रुती चौधरी २००९ ते २०१४ या काळात काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Maharashtra Live News Update: धाराशिवच्या परंडा तालुक्यातील भांडगाव येथील विश्वरुपा नदिवरील पुल ढासळला

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

कोण संजय राऊत? मी नाही ओळखत; आरोपांवर भडकले श्रीकांत शिंदे | VIDEO

SCROLL FOR NEXT