केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 9 जणांच्या VIP सुरक्षेतून NSG कमांडो हटवण्यात येणार आहेत. आता त्यांच्या जागी सीआरपीएफ जवान या नेत्यांची सुरक्षा करतील . केंद्र सरकारने याबाबत आदेश दिले आहेत. याशिवाय गृह मंत्रालयाने प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नवीन बटालियनला मंजुरी दिली आहे. त्यांना अलीकडेच संसदेच्या सुरक्षेतून हटवले जाणार गेले. या बटालियनला सीआरपीएफशी जोडण्याची तयारी सुरू आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने दहशतवादविरोधी कमांडो फोर्स एनएसजीला VIP सुरक्षेतून पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत ९ व्हीआयपींच्या सुरक्षेत कमांडोंना तैनात करण्यात आले होते. आता त्यांची सुरक्षा सीआरपीएफचे जवान करतील. आतापर्यंत झेड प्लस सुरक्षा असलेल्या नेत्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ब्लॅक कॅट कमांडोंवर होती. यात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपा सुप्रीमो मायावती, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेत्यांचा समावेश आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते एल के आडवाणी, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, बसपा सर्वेसर्वा मायावती, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह , गुलाम नबी आझाद, फारुख अब्दुला आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, यांच्या सुरक्षेसाठी एनएसजी कमांडो तैनात होते.
ज्या ९ व्हीआयपींच्या सुरक्षेतून NSG कमांडो काढले जाणार आहेत, त्यांच्याकडे ASL म्हणजेच Advanced Security Line Protocol आहे. म्हणजे जेव्हा VIP कोणत्याही ठिकाणी जातात तेव्हा त्या ठिकाणाची झडती आणि तपासणी घेतली जाते आणि सुरक्षा तपासली जाते. आता सीआरपीएफ या दोन नेत्यांसाठी एएसएल प्रोटोकॉल देखील हाताळणार आहे. आतापर्यंत सीआरपीएफ अमित शहा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि गांधी कुटुंबासाठी कार्यरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.