Bomb Threat: चार विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती; एअर इंडियाचं विमान कॅनडात तर एअर इंडिया एक्सप्रेस उतरलं आयोध्येत

Bomb Threat: एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर ते विमान कॅनडातील इक्लुइट आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं.
Bomb Threat: चार विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती; एअर इंडियाचं विमान कॅनडात तर एअर इंडिया एक्सप्रेस उतरलं आयोध्येत
Published On

एकामागून एक ४ विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून शिकागोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्बस्फोट झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडालीय. एअर इंडियाच्या AI १२७ फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्याला कॅनडाकडे वळवण्यात आले आहे. ही धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली होती. या विमानाला कॅनडातील इक्लुइट आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरायचे होते. याचबरोबर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातही बॉम्ब असल्याची धमकी आली होती.

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातही बॉम्ब असल्याची धमकी आल्यानंतर विमानाला उशीर झाला. या फ्लाइटमध्ये 132 प्रवासी होते. हे विमान जयपूरहून बेंगळुरूला जाणाऱ्या विमानाला अयोध्येत थांबण्यात आले. एअर इंडिया एक्सप्रेसने या संदर्भात एक निवेदन जारी केलंय. निवेदनानुसार, काही सोशल मीडिया पोस्टद्वारे अनेक विमान कंपन्यांना धमकी आलीय. यानंतर विमान वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारीदेखील एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती.

आज दुसऱ्या दिवशीही विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइटमध्ये १३२ प्रवाशी होते. हे विमान जयपूरहून आले होते. अयोध्यामध्ये काही वेळ थांबवल्यानंतर ते बेंगरुळूला जाणार होते.

या विमानांना मिळाली धमकी

सोशल मीडियावर चार विमानांना धमकी देण्यात आली होती. यात एअर इंडिया एक्स्प्रेसची जयपूर ते अयोध्या आणि बंगळुरू, स्पाईसजेटची फ्लाइट क्रमांक SG116, सिलीगुडी ते बंगळुरू, Akasa एअरची फ्लाइट क्रमांक QP 1373 आणि दिल्ली ते शिकागो अशी एअर इंडियाची फ्लाइट क्रमांक AI 127 यांचा समावेश आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांत विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या 5 धमक्या आल्या आहेत. त्यामुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. वळवण्यात आलेल्या विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे एअर इंडियाने म्हटलंय.

एअर इंडियाच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा प्रोटोकॉलनुसार फ्लाइट क्रमांक AI 127 आणि प्रवाशांची पुन्हा तपासणी केली जात आहे. एअर इंडियाने प्रवाशांच्या मदतीसाठी विमानतळावर एजन्सी सक्रिय केल्या आहेत. एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांना झालेल्या त्रास आणि गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केलाय. एअरलाइनला झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आम्ही जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहोत, असल्याची माहिती एअर इंडियाने दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com