Haryana CM Oath Ceremony : हरियाणाच्या नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली; PM मोदीही होणार सामील

Haryana CM Oath Ceremony update : हरियाणाच्या नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदीही सहभागी होणार आहेत.
हरियाणाच्या नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली; PM मोदीही होणार सामील
Haryana CM Oath Ceremony Google
Published On

हरियाणा : हरियाणाच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार, याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. नायब सिंह सैनी १७ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या रुपात शपथ घेणार आहेत. या शपधविधीच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सामील होणार आहेत. सैनी यांच्या शपथग्रहण सोहळ्याला भाजपची सत्ता असलेल्या राज्याचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, हरियाणात नायब सिंह सैनी हे मुख्यमंत्रिपदाची १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शपथ घेणार आहेत. हरियाणातील पंचकुलाच्या सेक्टर पाच येथील दसरा मैदानात शपथविधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी माहिती देताना म्हटलं की, 'आम्हाला पंतप्रधान मोदींची मंजुरी मिळाली आहे. नव्या सरकारचा शपधविधी सोहळा १७ ऑक्टोबर रोजी होईल. ९० विधानसभा मतदारसंघ असलेल्या हरियाणा राज्यात भाजपचे एकूण ४८ आमदार आहेत. या व्यतिरिक्त ३ अपक्ष आमदारांचाही पाठिंबा मिळाला आहे'.

हरियाणाच्या नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली; PM मोदीही होणार सामील
Haryana Elections Result: हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव का झाला? बैठकीत राहुल गांधींनी सांगितलं कारण

हरियाणाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पंडित मोहन लाल बडौली यांनी अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा मिळाल्यानंतर म्हणाले की, 'मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वात ५१ आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर हरियाणात तिसऱ्यांदा भाजप सरकारची स्थापना होणार आहे. हरियाणातील जनतेने भाजपला बहुमत दिलं आहे. हरियाणात भाजपचे ४८ उमेदवार जिंकले आहेत. तर तीन अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

बडौली पुढे म्हणाले, 'स्वत:चा पराभव स्वीकारणे काँग्रेसची जुनी परंपरा आहे. हरियाणातील काँग्रेस पराभव हा पक्षातील गटबाजीमुळे झाल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसमधील लोक एकमेकांचं डोक फोडण्यात व्यग्र असतात. काँग्रेसमधील नेते फक्त समीक्षा करतात. मात्र, त्यांच्यामध्ये सुधारणा होत नाही. ते त्यांची सवय बदलू इच्छित नाहीत'.

हरियाणाच्या नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली; PM मोदीही होणार सामील
Haryana Election Result: ‘कौल’ इतक्या झपाट्याने कसे काय बदलू शकतात? सामना अग्रलेखातून उपस्थित केला प्रश्नचिन्ह

बडौली पुढे म्हणाले, 'हिसारमध्येसावित्री जिंदल, बहादूरगडहून राजेश जून आणि गनौरमध्ये देवेंद्र कादियान यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. ५१ हा आकडा शुभ आहे. आम्ही ५१ आमदारांसोबत सरकारची स्थापना करत आहोत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com