BJP  saam tv
देश विदेश

Haryana CM Face : हरियाणात भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार? सैनी, खट्टर की नवा चेहऱ्याला संधी? महत्वाची अपडेट आली समोर

Haryana CM Face update : हरियाणात भाजपला बहुमत पाहायला मिळताना दिसत आहे. हरियाणात नायब सैनी यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

चंडीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. हरियाणात भाजपची वाटचाल बहुमताकडे सुरु आहे. यामुळे भाजपकडून हरियाणाचा भाजपचा चेहरा कोण असणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. हरियाणाच्या निकालानंतर नायब सिंह सैनी यांच्या ऐवजी नवा चेहऱ्याला संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, हरियाणात नायब सैनीच मुख्यमंत्री राहणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष मोहनलाल यांनी स्पष्ट केलं आहे.

मोहनलाल यांनी नायब सैनी हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचं भाष्य केल्याने पक्षातील वरिष्ठ नेता अनिल विज यांना मोठा झटका मानला जात आहे. अनिल यांचा नायब सैनी यांना मुख्यमंत्रिपद देण्याच्या विरोधात आहेत. हरियाणाचे भाजप प्रदेश मोहनलाल म्हणाले की, 'हरियाणात तिसऱ्यांदा भाजप सरकारची स्थापना होणार आहे. तसेच त्यांनी अनिल विज मुख्यमंत्री होणार नसल्याचे स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष मोहनलाल यांच्या विधानाने अनिल विज नाराजी पाहायला मिळू शकते.

हरियाणातील निकाल आल्यानंतर अनेकदा विज आणि त्यांचे कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करताना दिसले. तसेच अनेक ठिकाणी मतमोजणी सुरु आहे. अनेक ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. ज्या जागंवर भाजप आघाडीवर आहे, त्या जागांवर भाजप सहज जिंकेल,असा दावा विज यांनी केला होता.

'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, असं गाणं म्हणत मुख्यमंत्रिपदावर दावा केला. तसेच पक्ष ठरवेल, ते मान्य असेल, असे अनिल विज यांनी स्पष्ट केले. मोहनलाल यांनी त्यांच्या नावाची चर्चा फेटाळली, त्यावर अनिल विज यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हरियाणात कोणता पक्ष किती जागा जिंकल्या?

हरियाणात भाजप पक्ष बहुमतात पाहायाला मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, भाजपने ४८ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या आहेत. तर इंडियन नॅशनल लोकदलाने ३ जागा जिंकल्या आहेत. तर ३ अपक्ष निवडून आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

SCROLL FOR NEXT