हरियाणा निवडणुकीत आम आदमी पार्टीला खातंही उघडता आलं नाही, मात्र तरी जम्मू काश्मीरच्या राजकारणात आपने एन्ट्री केली आहे. जम्मू काश्मीरच्या डोडा विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे उमेदवार मेहराज मलिक यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गजसिंग राणा यांचा 4 हजारांहून अधिक मत फरकाने पराभव केला. याआधी आम आदमी पार्टीने दिल्ली, पंजाब, गुजरात आणि गोव्यात काही जागांवर विजय मिळवला आहे.
मेहराज मलिक यांच्या विजयानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. "डोडा विधानसभा मतदारसंघातून AAP चे उमेदवार मेहराज मलिक यांचे भाजपाला पराभूत केल्याबद्दल अभिनंदन. तुम्ही एक चांगली निवडणूक लढवली, असं म्हटलं आहे.
जम्मू काश्मीरच्या राजकारणातल हा पहिला टप्पा आहे, अजून पुढे जायचं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही सर्व जागांवर निवडणूक लढवू शकलो नाही, याची खंत आहे. आम्ही जनतेची लढाई लढत आहोत. आता जम्मू-काश्मीरची विधानसभा असेल आणि मेहराज मलिक तिथे दिसतील. आता काम करण्याची वेळ आहे. जे लोक भ्रष्ट आहेत, जे लुटण्याचे काम करतात, ज्यांचा धंदा निवडणुकीवर चालतो, त्यांना जनतेने आरसा दाखवला आहे.
आम आदमी पक्षाचे नेते मेहराज मलिक आता आमदार झाले आहेत. बऱ्याच काळापासून पक्षासाठी ते काम करत आहेत. डोडा भागात त्यांना सुरुवातीपासूनच पाठिंबा राहिलेला आहे. त्यामुळे पक्षाने यावेळी त्यांना तिकीट दिलं आणि त्यांनी पक्षाच्या अपेक्षांवर खरे उतरून विजय मिळवला. यापूर्वी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीतही विजय मिळवला होता. त्यावेळीही त्यांनी आम आदमी पक्षाकडूनच निवडणूक जिंकली होती. 36 वर्षांचे मेहराज उच्च शिक्षित आहेत.
2008 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचं ठरवलं होतं. गावात आणि आसपासच्या भागात भ्रष्टाचार होत होता. त्याविरोधात लढा देण्यासाठी त्यांना राजकारण मार्ग वाटला.. त्यानंतर त्यांनी राजकारणात येण्याचं ठरवलं होतं. तो असा काळ होता जेव्हा त्यांनी कॉलेजचे शिक्षण पूर्ण केलं होते.
या काळात पीडीपी आणि काँग्रेसकमध्येही जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या पक्षांनी त्यांची त्यावेळी दखल घेतली नाही. दिल्ली मॉडेलविषयी म्हणजेच आम आदमी पार्टीचा बोलबाला होता. 2013 चा तो काळ होता, जेव्हा त्यांना वाटले की आम आदमी पार्टी देशात बदल घडवू शकते. त्यानंतर त्यांनी काश्मीरवरून दिल्लीची ट्रेन पकडली आणि दिलीत आले.
डोडा विधानसभा मतदारसंघाचा निकाल
डोडा विधानसभा मतदारसंघात 73 हजार मतदान झालं आहे. त्यातील आम आदमी पार्टीच्या मेहराज मलिक यांना 23 हजारांहून अधिक मते मिळाली. तर, गजसिंग राणा यांना 19००० मतं मिळाली आहेत. याशिवाय उमर अब्दुल्लांच्या जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार खालिद नजीब यांना 13 हजार मते मिळाली. तसेच डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे उमेदवार अब्दुल मजीद वाणी यांनाही 10 हजार मते मिळाली.
12 वर्षांपूर्वी आंदोलनातून राजकीय पार्टी बनलेल्या AAP ची दिल्लीतून राजकीय कारकीर्द सुरू झाली होती. दिल्लीच्या एमसीडीमध्येही भाजपाला पराभूत करून विजय मिळवला. गोवा आणि गुजरातच्या विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी काही जागांवर विजय मिळवला. आता जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत खाते उघडून पक्षाला अधिक मजबूत केलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.