Haryana J&K Assembly Election Results: हरियाणा आणि जम्मू काश्मिरमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. प्रत्येकी ९० जागांवर होत असलेल्या या निवडणुकीच्या निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर हरियाणामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली मात्र नंतर भाजपने कमबॅक करत बहुमताचा आकडा गाठला आहे. या निकालावरुन काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत.
हरियाणातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोग जाणूनबुजून डेटा संथ गतीने अपडेट करत आहे, ज्यामुळे निकालांची पारदर्शकता धोक्यात येत आहे, असा घणाघात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर लोकसभा निवडणुकी सारखे आकडे स्लो अपडेट केले जात आहेत.
भाजप कालबाह्य आणि दिशाभूल करणारे ट्रेंड शेअर करून प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे का? असे जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. तसेच निवडणूक आयोगाला त्वरीत आणि अचूक निकाल सामायिक करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून मतदार आणि जनतेचा विश्वास कायम राहील, असेही ते म्हणालेत.
"हरियाणा 70 जागा काँग्रेसला येणार हे सगळेच सर्वे सांगत होते. जनतेचे मत ईव्हीएममध्ये बदलत असेल अशी चर्चा जनतेत सुरू आहे. एव्हीएम मशीनवर आमचा आरोप नाही. मात्र जनतेच्यामध्ये सर्वेशच्या माध्यमातून समोर आलं होतं त्यावर देखील दुर्लक्ष करता येणार नाही.अजून मतमोजणी सुरू आहे आम्हाला आशा आहे की आम्ही हरियाणात सरकार स्थापन करू. हरियाणातीस शेतकरी असतील तरुण तसेच विविध जाती-धर्माचे लोक होते हे नाराज होते आणि तेच सर्वेमध्ये दिसून आलं होतं," असं नाना पटोले म्हणालेत.
"गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे मुख्यमंत्री सैनिक हे सांगत होते की सर्वेच्या विपरीत निकाल लागतील आणि मग विरोधी पक्ष ईव्हीएम वरती बोट दाखवेल वरती त्यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ते एवढ्या स्पष्टपणे कसं बोलू शकतात. ईव्हीएमबद्दलची शंका भाजपनेच निर्माण केली, असा आरोपही नाना पटोलेंनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.