PM Modi HarGharTiranga  
देश विदेश

PM Modi: अरुणाचल प्रदेशातील नागरिकांची देशभक्ती पाहून PM मोदी खूश; शेअर केला खास व्हिडिओ

PM Modi HarGharTiranga : देशभरात उद्या ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वी पंतप्रधान मोदींनी 'हर घर तिरंगा' अभियान राबवावे, असे आदेश दिले होते. 'हर घर तिरंगा' या अभियानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे स्वत: पंतप्रधान मोदींनी तो व्हिडिओ एक्सवर शेअर केलाय.

Bharat Jadhav

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश राज्यातील नागरिकांचं देशावरील प्रेम खूप आनंदी झालेत. राज्यातील पूर्व कामेंग येथील सेप्पा येथे काढण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा यात्रा' पाहून पंतप्रधान मोदी खूश झालेत. त्यांनी आपला आनंद व्यक्त करताना तेथील एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ पोस्ट करताना अरुणाचल प्रदेशच्या चैतन्यशील सांस्कृतिक वारशात देशभक्ती स्पष्टपणे दिसून येते, अशी कमेंटदेखील त्यांनी केलीय.

राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओवर पंतप्रधान मोदींनी कमेंट केलीय. “अरुणाचल प्रदेश अशी भूमी आहे जिथे प्रत्येक नागरिकांच्या हृदयात देशभक्ती खोलवर रुजलेली आहे. हे राज्याच्या चैतन्यशील सांस्कृतिक वारशात स्पष्टपणे दिसून येते. #HarGharTiranga बद्दल इतका उत्साह पाहून आनंद झाला.", अशी टिप्पणी मोदींनी या व्हिडिओवर केलीय.

पूर्व कामेंग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुख्यालय सेप्पा येथे आज ६०० फूट लांबीचा तिरंगा असलेली विशाल 'हर घर तिरंगा यात्रा' सार्वजनिक रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांच्या मनात ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवानिमित्त स्वातंत्र्य, देशभक्ती आणि राष्ट्रवादाची भावना भरलेली होती.राष्ट्राचा जयजयकार करत नागरिकांनी या यात्रेत सहभाग घेतला होता.

मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी X वर या यात्रेची ५४ सेकंदाची व्हिडिओ क्लिप पोस्ट करताना, लिहिले की, “हमारी शान तिरंगा (आमचा अभिमान तिरंगा)” हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत सेप्पा, पूर्व कामेंग येथे भव्य ६०० फूट लांबीचा तिरंगा हाती घेत यात्रा आयोजित करण्यात आली होती. तिरंगा यात्रेत राज्याचे गृहमंत्री मामा नाटुंग यांच्यासह आमदार इलिंग तालांग आणि हायंग मांगफी, पूर्व कामंग उपायुक्त सचिन राणा, एसपी कामदम सिकोम, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, शाळकरी मुले आणि इतर संबंधितांनी सहभाग घेतला होता.

दरम्यान, शहराच्या रस्त्यांवरून भव्य तिरंगा नेत असताना, विद्यार्थ्यांसह सहभागींनी "वंदे मातरम्" चा नारा दिला, देशभक्तीची घोषणा आकाशात घुमत होत्या. या घोषणांनी एकात्मता आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतिबिंब झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या बडनेरा मधील जुनी वस्तीमध्ये 28 वर्षे तरुणाची निर्घृण हत्या

Watch: धक्कादायक! खेळताना बास्केटबॉलचा पोल अंगावर कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू

Monkey: माकडांना पकडा अन् ६०० रुपये मिळवा; राज्य सरकारकडून निर्देश जारी

Winter Skin Care : हिवाळ्यात मेकअप कसा टिकवावा? जाणून घ्या टिप्स

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

SCROLL FOR NEXT